धक्कादायक! गोव्यातील आग्वाद किल्ल्यात मद्यविक्री; आप म्हणतंय, हेच विकासाचं मॉडल?

किल्ल्यातील मद्य विक्री त्वरीत बंद करण्यासह कारवाईची मागणी
Liquor Sale At Aguada Fort
Liquor Sale At Aguada FortDainik Gomantak
Published on
Updated on

Liquor Sale At Aguada Fort: गोवन स्वातंत्र्य संग्रामाचा साक्षीदार असलेल्या आग्वाद किल्ला (Aguada Fort) येथे मद्यविक्री केली जात असल्याचे समोर आल्यानंतर त्यावरून विविध पतिक्रिया समोर येत आहेत. गोव्यातील आम आदमी पक्षाने याबाबत थेट राज्य सरकारलाच सवाल केले आहेत.

Liquor Sale At Aguada Fort
Goa Accident: मोले येथे राष्ट्रीय महामार्गावर खासगी बस-इनोव्हा कारचा भीषण अपघात

आम आदमी पक्षाचे गोवा समन्वयक ॲड. अमित पालेकर यांनी स्वतःच्या ट्विटर अकाऊंटवरून या मद्य विक्रीची छायाचित्रेच सोशल मीडियात पोस्ट केली आहेत.

गोव्याच्या स्वातंत्र्य चळवळीचे केंद्र राहिलेल्या आग्वाद किल्ल्यावर (Aguada Fort) मद्य विक्री केली जात आहे. याला परवानगी कुणी दिली? हे समोर आले पाहिजे. हे गोव्याचे नवे बिझनेस मॉडेल आहे का? यातून स्वातंत्र्यसैनिकांच्या बलिदानाचा अपमान केला जात आहे, अशी टीका ॲड. अमित पालेकर यांनी केली आहे. दरम्यान, किल्ल्यातील मद्यविक्री त्वरीत बंद करून, दोषींवर कारवाईची मागणी होत आहे.

दरम्यान, भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त या किल्ल्यातील वस्तुसंग्रहालय वर्षभरासाठी विद्यार्थ्यांना मोफत पाहता येणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

E20 Petrol Mileage
Goa Mumbai Highway Liquor Seizure
 Micky Pacheco NDZ Remarks
Arvind Kejriwal Go
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com