Govind Gaude Sports Minister Goa Dainik Gomantak
गोवा

क्रीडामंत्री अॅक्शन मोडमध्ये, भल्या पहाटे फातोर्डा स्टेडियमची पाहणी

क्रीडा खात्यातील कामचुकार कर्मचाऱ्यांवर कडक कारवाईचा इशारा

दैनिक गोमन्तक

मडगाव : क्रीडामंत्री गोविंद गावडे यांनी क्रिडा खात्याची सुत्रे हातात घेतल्याबरोबर धडाकेबाज सुरुवात केली आहे. क्रीडा खात्यातील कामचुकार कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल असे त्यांनी याआधीच स्पष्ट केले आहे. आज पहाटे फातोर्डा स्टेडियमवर भेट देत गोविंद गावडेंनी अधिकाऱ्यांचा धक्काच दिला आहे.

गोव्याचे क्रीडामंत्री गोविंद गावडे (Govind Gaude) यांनी आज मंगळवारी सकाळी 6 वाजता फातोर्डा स्टेडियमची पाहणी केली आणि तेथील अधिकाऱ्यांना कडक शब्दांमध्ये खडे बोल सुनावले.आज त्यांनी इनडोअर स्टेडियम, जिम, जलतरण तलावासह परिसराची पाहणी केली. हल्लीच वादळी वाऱ्यामुळे स्टेडियमवरील पत्रे खाली पडले होते. त्याची पण पाहणी केली आणि दुरुस्तीचे आदेश दिले.

दरम्यान प्रशिक्षक (Coach) आणि कर्मचाऱ्यांचा कामचुकारपणा पाहून गोविंद गावडे चांगलेच संतापले. सर्व कर्मचाऱ्यांनी आणि प्रशिक्षकांनी वेळेवर कामावर येणे गरजेचे आहे असे सांगत जलतरण तलावाची दुरुस्ती लवकरच सुरु केली जाईल असेही त्यांनी सांगितले. फातोर्डा (Fatorda) स्टेडियम परिसर आणि मैदानावरील कचरा पाहून क्रीडामंत्री भडकले. त्यांनी 48 तासांमध्ये हा परिसर स्वच्छ करण्याचे आदेश स्टेडियम व्यवस्थापकाना दिले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Crime News: लाकडाच्या भुशात दारु लपवली, कर्नाटकच्या गाडीला गोव्याची नंबरप्लेट लावली; केरी नाक्यावर 12 लाखांचे गोवा बनावटीचे मद्य जप्त

Goa News Live Updates: राष्ट्रीय महामार्ग अनमोड येथे खचल्याने अनमोड घाटावरुन जाण्यास अवजड वाहनांना प्रवेश बंद

Goa Crime: प्रत्येकाने कायदा हातात घ्यायला सुरुवात केली तर; गोव्यात, देशात ‘जंगल राज’ निर्माण व्हायला वेळ लागणार नाही

Shani Budh Vakri: शनि-बुध ग्रहांचा राशीबदल 'या' तीन राशींसाठी भाग्यकारक; धनलाभ ते प्रेमविवाहापर्यंत संधींचे दार उघडणार

Goa Ranji: नवीन मोसम, नवीन प्रशिक्षक! 'गोवा क्रिकेट'ची परंपरा सुरुच; बडोद्याचे 'मेवाडा' सहावे कोच नियुक्त

SCROLL FOR NEXT