Goa sports minister Govind Gaude meets Amitabh Bachchan  Dainik Gomantak
गोवा

Govind Gaude: 'बिग बीं'च्या भेटीला मंत्री गोविंद गावडे; गोव्यातील राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या थीम साँगला देणार आवाज

सोशल मीडिया पोस्टमधून दिली माहिती

Akshay Nirmale

Govind Gaude Meets Amitabh Bachchan: गोव्याचे क्रीडा आणि सांस्कृतिक मंत्री गोविंद गावडे यांनी नुकतीच ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांची भेट घेतली. गोव्यात ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या 37 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेबाबत ही भेट घेण्यात आली आहे.

या स्पर्धेच्या थीम साँगसाठी बिग बी अमिताभ बच्चन आवाज देणार आहेत. त्यांनी यासाठी संमती दर्शवली आहे, अशी माहिती मंत्री गोविंद गावडे यांनी सोशल मीडिया पोस्टमधून दिली आहे. त्यांची ऋजुता, एक कलावंत म्हणून त्यांनी केलेले आदरातिथ्याने भारावलो आहे. त्यांची हीच वृत्ती त्यांना उत्तम अभिनेता बनवते, असे गावडे यांनी म्हटले आहे.

गोव्यात 25 ऑक्टोबरला या स्पर्धेचे उद्‍घाटन होईल. ही स्पर्धा 16 दिवस चालणार आहे. 9 नोव्हेंबर रोजी स्पर्धेचा समारोप होईल. स्पर्धेच्या उद्‍घाटनाविषयी पंतप्रधान कार्यालयाने एक निश्चित तारीख पाठविण्यास सांगितली होती.

त्यानुसार 25 ऑक्टोबर ही तारीख कळवली आहे. स्पर्धेचे उद्‍घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होऊ शकते. राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या बोधचिन्हाचे 14 मे रोजी, तर शुभंकर ‘मोगा’चे 18 जून रोजी डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी इनडोअर स्टेडियममध्ये अनावरण झाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Virat Kohli: क्रिकेट विश्वात खळबळ! 'हा माझा शेवटचा वनडे वर्ल्ड कप', भारत-वेस्टइंडिज मालिकेपूर्वी किंग कोहलीनं फोडला मोठा बॉम्ब

Goa Agriculture: पिकलेल्या भातशेतीसमोर मोठे संकट, हार्वेस्टिंग मशीनची प्रतीक्षा; मांद्रे-कोरगाव हद्दीतील पीक वाया जाण्‍याची भीती

Asian Games 2026: गोल्डन गर्लज्! रोमहर्षक लढतीत भारताच्या पोरींनी मारली बाजी; इराणची धूळधाण करत पटकावलं 'सुवर्णपदक' VIDEO

Stray Cattle: होंडा-वाळपई मार्गावर भटक्या गुरांचा सुळसुळाट, रात्रीच्‍या वेळी रस्त्यावर ठाण; अपघातांना आमंत्रण, दुचाकीस्‍वारांना धोका

Patto Bridge Security: पाटो पुलावरील सुरक्षेच्या त्रुटींवर 'मानवाधिकार'ची तंबी; सीसीटीव्ही, पथदिवे आणि 24 तास पोलिस गस्तीचे निर्देश

SCROLL FOR NEXT