Nilesh Cabral |Goa Government Dainik Gomantak
गोवा

Mahadayi Water Dispute: अमित शाहांच्या वक्तव्याचा मंत्री काब्राल यांनी केला निषेध; म्हणाले, बैठकीत...

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हादई विषयावर केले होते वादग्रस्त वक्तव्य

Rajat Sawant

Mahadayi Water Dispute: केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी म्हादईबाबत केलेल्या वक्तव्याचा राज्यात निषेध करण्यात येत आहे. या प्रकरणावर आता पर्यावरण मंत्री निलेश काब्राल यांनी भाष्य केले असून अमित शहांच्या वक्तव्याचा निषेध केला आहे. शहांसोबत झालेल्या बैठकीत आम्ही केवळ म्हादई वाचवण्यावर चर्चा केली होती असेही त्यांनी यावेळी सांगितले.

"आम्ही गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली होती त्यावेळी आम्ही केवळ म्हादई वाचवण्यावर चर्चा केली होती. त्यावेळी पाणी वळविण्यास आमचा विरोध असल्याचे त्यांना सांगितले होते. म्हादईचे पाणी वळविण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतलेला नाही."

"म्हादई नदीचा प्रश्न जर कायमचा सुटणार असेल तर मी राजीनामा देण्यास तयार आहे. पुन्हा शिष्टमंडळ शहा यांची भेट घेणार आहे. यावेळी शहांकडे त्या व्यक्तव्याचे स्पष्टिकरण मागणार आहोत." 

"म्हादई विषयावर मुख्यमंत्री तसेच सरकार गंभीर असून म्हदाईचे पाणी वळविण्याला आमचा विरोध आहे." म्हादई वाचविण्यासाठी आम्ही सर्व ते प्रयत्न करणार आहोत. म्हादईच्या रक्षणासाठी आम्ही झगडत राहू. राजकीय आणि कायदेशीर अशा दोन्ही मार्गांनी नदीचे रक्षण करु" असे आश्वासन यावेळी काब्राल यांनी दिले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mitchell Starc Fight: लाईव्ह सामन्यात 'रनिंग लाईन'वरुन राडा! मिचेल स्टार्क मेहदी हसन मिराजशी भिडला; हाय-व्होल्टेज ड्रामा व्हायरल

Goa Olympic Association: 'गोवा ऑलिंपिक'ला 21 वर्षांनंतर लाभणार नवा सचिव, गुरुदत्त भक्ता यांची दोन दशकांची कारकीर्द; महत्त्वाच्या स्पर्धांचे राज्यात आयोजन

Shukra Pushkaransh Yog 2026: शुक्रदेवांची अफाट कृपादृष्टी! 15 ऑगस्टपासून 'या' राशींच्या नशिबाला मिळणार नवी दिशा; 'शुक्र पुष्करांश' योग करणार मालामाल

Calangute Dance Bar: कळंगुटमधील 'डान्स बार' बंद करा, गट काँग्रेस समितीची मागणी; पोलिसांना निवेदन सादर

Child Disappearance Goa: राज्यात पाच वर्षांत हरवली 256 मुले, 106 सापडली,150 बेपत्ता

SCROLL FOR NEXT