Margao : सिंधुदुर्गात बलात्कार करून फरार संशयिताला गोव्यात अटक

मडगाव रेल्वे स्थानक परिसरात करण्यात आली अटक
accused from Sindhudurga arrested by Margao police
accused from Sindhudurga arrested by Margao policeDainik Gomantak

Margao : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सांवतवाडी येथून एका फरार आरोपीला गोव्यातील मडगाव येथे अटक करण्यात आली. या संशयिताला तब्बल आठ महिन्याच्या कालावधी नंतर आज मडगाव रेल्वे स्थानक परिसरात अटक करण्यात आली आहे.

त्याला आता सावंतवाडी पोलीसांच्या ताब्यात देण्यात येणार असल्याची माहिती मडगाव पोलीस स्थानकाचे निरीक्षक तुळशीदास नाईक यांनी दिली.नाईक यांनी सांगितले.

accused from Sindhudurga arrested by Margao police
Benaulim : पेडा वार्का येथील पाणी प्रश्न सोडवणार; आमदार व्हीएगस यांचे संतप्त नागरिकांना आश्वासन

सावंतवाडी येथे एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याच्या आरोपाखाली सावंतवाडी पोलीसांनी अटक केल्यावर त्यांच्या हातावर तुरी देऊन फरार झालेल्या प्रमोद मधुकर परब (48, पाडसे कुडाळ) या संशयिताला तब्बल आठ महिन्याच्या कालावधी नंतर आज मडगाव रेल्वे स्थानक परिसरात अटक केली.

accused from Sindhudurga arrested by Margao police
Overcomes Disability: अपंगत्वावर मात करणारी ‘फुलराणी’
accused
accusedDainik Gomantak

या संशयिता विरोधात सुनावणी चालू असताना 24 मे 2022 रोजी तो पोलीस कोठडीतून फारार झाला होता. त्यानंतर मडगाव येथे स्टेशन रोड परिसरात तो रस्त्यावरच रहात होता आणि हमालीचे काम करून आपला उदर निर्वाह करत होता.

सदर संशयीत सावंतवाडी पोलीसांना वॉन्टेड असल्याची माहिती मिळाल्यावर आज त्याला अटक करण्यात आली अशी माहिती मडगाव पोलीस स्थानकाचे निरीक्षक तुळशीदास नाईक यांनी दिली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com