Goa mining Dainik Gomantak
गोवा

सांगे-पणसय मळ येथील ‘त्या’ चिरेखाणी बेकायदाच!

खंडपीठाला माहिती : तपासणीस इतिहासकारांची घेणार मदत

दैनिक गोमन्तक

पणजी: सांगे तालुक्यातील उसगाळी मळ गावातील पणसय मळ येथे सुरू असलेले चिरेखाणीचे उत्खनन हे बेकायदा असून त्यासंदर्भात पोलिस स्थानकात गुन्हा नोंद झाला आहे. हे प्रागैतिहासिक खडकांवरील कोरीव काम सुमारे 6 ते 8 हजार वर्षांपूर्वीचे आहे. तेथील जागा खडकाळ पठाराची असल्याने तेथे आणखी असे कोरीव खडक असण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्याच्या तपासणीसाठी नामांकित पूर्व इतिहासकारांची मदत घेणार असल्याची माहिती आज सरकारतर्फे देण्यात आली.

(mining in sanguem is illegal)

पुराभिलेख व पुरातत्व खात्याने सुरक्षित क्षेत्र म्हणून घोषित केलेल्या जागेपासून सुमारे 300 मीटर अंतरावर सुरू असलेल्या चिरेखाणींमुळे खडकावरील कोरीव कामाला धोका निर्माण झाला असल्याने मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने त्याची दखल घेतली होती. खंडपीठाने याप्रकरणी दखल घेताच पोलिसांनी या बेकायदा चिरेखाणी उत्खननप्रकरणी संबंधिताविरुद्ध गुन्हा दाखल केला होता व पुढील तपास सुरू केला आहे, यासंदर्भातची माहिती आज पोलिसांनी सीलबंद लिफाफ्यात न्यायालयाला सादर केली.

दरम्यान, पुराभिलेख व पुरातत्व खात्याचे संचालक श्रीमती ब्लॉसम मदेरा यांनी खंडपीठासमोर प्रतिज्ञापत्र सादर केले आहे. पणसय मळ येथील चिऱ्यांच्या दगडावर विविध कोरीव चित्रे आहेत. त्यामध्ये काही प्राणी तसेच ससंकृतीशी संबंधित आहेत.

या जागेतील खडकांवर कोरीव चित्रे असल्याचा शोध 1993साली लागला होता. जेव्हा या ठिकाणी चिरेखाणी उत्खननाचा प्रयत्न करण्यात आला होता. हे सरकारच्या निदर्शनास आणून दिल्यावर ही जागा 1999 साली पुरातन स्मारके व पुराभिलेख परिसर म्हणून घोषित करण्यात आली होती. सध्या त्याचा समावेश जागतिक वारसास्थळांमध्ये करण्याची शिफारस केंद्र सरकारने केली आहे, असे खंडपीठाला दिलेल्या प्रतिज्ञापत्रात सरकारने म्हटले आहे.

पुराभिलेख खात्याच्या अधिकाऱ्यांनी 24 मे 2022 रोजी पणसय मळ येथील चिरेखाणी सुरू असलेल्या परिसराची पाहणी केली होती. सुरक्षिततेच्या जागेपासून 300 मीटरवर ही चिरेखाण सुरू असल्याचे आढळून आले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT