विधवा प्रथेविरोधात ग्रामीण गोवा सरसावला

महिला अग्रणी : आम्ही जे भोगलेय ते दुसऱ्यांच्या वाट्याला नको! पीडितांची भावना
widow
widowDainik Gomantak
Published on
Updated on

सुशांत कुंकळयेकर

मडगाव: वैधव्य आल्यावर आम्हाला जे भोग भोगावे लागले, ते इतर महिलांच्या नशिबी नकोत, अशी भावना गोव्यातील ग्रामीण भागात रुजू लागली आहे. विधवा प्रथा बंद व्हावी, यासाठी आता गोव्यातील ग्रामीण महिला पुढाकार घेऊ लागल्या आहेत. परिणामी आतापर्यंत तब्बल 10 पंचायतींनी विधवा प्रथेवर बंदीचा ठराव मंजूर केला आहे.

(Initiative of rural Goa against widow practice)

widow
शेतजमिनीसह नाले बुजविल्याचा फटका रहिवाशांना

23 जून हा दिवस जागतिक विधवा दिन म्हणून पाळला जातो. या पार्श्वभूमीवर ‘गोमन्तक’ने ग्रामीण भागाचा कानोसा घेतला असता, हे प्रागतिक चित्र दिसून आले. उगे-सांगेच्या पंचसदस्य दिव्या नाईक या त्यापैकी एक. नाईक यांचे पती दिलकुश यांचे दोन वर्षांपूर्वी निधन झाले. सुरवातीला त्यांच्यावरही गावच्या लोकांकडून हे विधी करण्यासाठी दडपण आले. मात्र, त्यांनी खंबीरपणे त्याला नकार दिला.

काही ठिकाणी परंपरेच्या नावाखाली या प्रथा अजूनही चालतात, अशी माहिती कुंडई येथील शैला नाईक यांनी दिली. काही वर्षांपूर्वी कुंडई येथे झालेल्या रस्ता अपघातात नाईक यांचे पती वारले. त्यावेळी त्यांच्यावरही हे विधी करण्यासाठी दडपण आले होते. पण त्यांनी त्याला विरोध केला.

फोंडा येथील निवृत्त पोलिस उपनिरीक्षक अचला गावस म्हणाल्या, यासाठी कायद्यापेक्षाही जनजागृती अधिक गरजेची आहे. यासाठी सुशिक्षित महिलांनी अन्य स्त्रियांना त्यांच्या अधिकारांची जाणीव करून देण्याची गरज आहे.

widow
राज्यातील पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी झाले?

राज्यातील पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी झाले?- ‘तो’ प्रसंग मनावर कोरला

अचला गावस म्हणाल्या, खरे तर माझ्या आईपूर्वी मला वैधव्य आले होते. त्यावेळी आई खंबीरपणे माझ्या पाठीशी उभी राहिली. माझ्या मुलीवर कसलीही बळजबरी नको, असे त्यांनी सांगितले. त्यानंतर माझे वडील गेले. तेव्हा काही शेजारणी विधवा विधी करण्यासाठी आल्या, तेव्हा आई त्यांना म्हणाली, मी सौभाग्यवती असताना तुम्ही कधी एक फुल घेऊन आल्या नाहीत आणि आजच का फुले घेऊन आलात? पण नंतर आईने स्वतःच कपाळावरील कुंकू पुसले आणि मंगळसूत्रही काढून ठेवले. हा प्रसंग माझ्या मनावर अजूनही कोरला गेला.

शेजाऱ्यांचे घायाळ करणारे टोमणे

आगस लोलये येथील माजी पंच उर्मिला लोलयेकर या गेली 18 वर्षे ही प्रथा बंद व्हावी, यासाठी काम करत आहेत. त्या म्हणाल्या, 2005 साली माझ्या पतीचे निधन झाले. त्यावेळी मी या प्रथा करण्यास विरोध केला. त्यावेळी घरची माणसे माझ्या पाठीशी उभी राहिल्याने त्रास झाला नाही. पण शेजाऱ्यांनी मारलेले टोमणे घायाळ करणारे होते. त्यामुळे मी लोकांच्या घरी जाऊन असे प्रकार रोखण्याचा अनेकदा प्रयत्न केला. परिणामी लोलये गावातून हे प्रकार नाहीसे झाले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com