CM Pramod Sawant Dainik Gomantak
गोवा

Mining Engineering: विद्यार्थ्यांची मागणी पूर्ण! खाण अभियांत्रिकी अभ्यासक्रम सुरू होणार

Pramod Sawant: फर्मागुढी येथील गोवा अभियांत्रिकी महाविद्यालयात हा अभ्यासक्रम आता पुन्हा सुरू करण्यात येणार आहे

गोमन्तक डिजिटल टीम

Mining Engineering Course

पणजी: राज्यात खाणी सुरू होण्याची चिन्हे दिसू लागल्यावर आता खाण अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रमाकडे विद्यार्थी वळू लागले आहेत. फर्मागुढी येथील गोवा अभियांत्रिकी महाविद्यालयाने मागणी घटल्याने हा अभ्यासक्रम बंद केला होता. तो आता पुन्हा सुरू करण्यात येणार आहे.

मंत्रिमंडळ बैठकीनंतर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले की, २० विद्यार्थ्यांनी हा अभ्यासक्रम सुरू करावा, अशी मागणी सरकारकडे केली होती. त्यानुसार हा अभ्यासक्रम सुरू करण्याची सूचना सरकारने महाविद्यालयाला केली आहे. यापूर्वी पदविका घेतलेल्यांना पदवी अभ्यासक्रमासाठीही आता प्रवेश घेता येईल.

Goa College of Engineering Farmagudi

वैद्यकीय सेवाभावी संस्थांना साहाय्य

गंभीर आजाराशी झुंजणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना वैद्यकीय सेवा पुरवणारी केंद्रे सरकारकडे नाहीत. तशी केंद्रे स्थापन करून किमान २० रुग्णांना दाखल करून घेणाऱ्या संस्थांना मासिक अडीच लाख रुपये मदत देणाऱ्या योजनेला राज्य मंत्रिमंडळाने आज मान्यता दिली. सरकार समाज कल्याण खात्याच्या माध्यमातून ही योजना राबवणार आहे. अर्थसंकल्पात यासाठी १० संस्थांना मदत कऱण्यासाठी तरतूद केली असून अशी मदत देण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी अर्थसंकल्पीय भाषणात दिले होते.

खाण खात्यात पदे भरणार

राज्यात खाणीसंदर्भातील खटल्यांमध्ये वाढ झाल्याने खाण खात्यामध्ये कायदा अधिकारी तसेच कनिष्ठ कायदा अधिकारी ही पदे निर्माण करून ती भरण्यास मंत्रिमंडळाने आज मान्यता दिली. शिवाय खाण खात्यातील रिक्त पदे कंत्राटी पद्धतीने भऱण्याचेही ठरविले आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी दिली.

यंदाही ई-चवथ बाजार

मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, यंदाही गणेश चतुर्थीसाठी घरोघरी लागणाऱ्या साहित्याची विक्री ‘गोवा बाजार डॉट कॉम’ या संकेतस्थळावरून करण्यात येणार आहे. ई-चवथ बाजार यंदाही सजेल. राज्यभरातील महिला स्वयंसेवी गट यासाठी काम करत आहेत. त्यांचा हुरूप वाढविण्याचे काम ऑनलाईन पद्धतीने साहित्याची खरेदी करून जनतेने केले पाहिजे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT