Latambarcem Mine Raid Dainik Gomantak
गोवा

Latambarcem Mine Raid: लाटंबार्सेत चिरेखाणीवर छापा; ट्रकसह यंत्रसामग्री जप्त

Goa Mining Department: डोंगराळ भागात बेकायदा चिरेखाण चालत असल्याची माहिती मिळताच खाण खात्याच्या अधिकाऱ्यांनी या चिरेखाणीवर अचानक छापा टाकला

गोमन्तक डिजिटल टीम

डिचोली: डिचोली तालुक्यातील लाटंबार्से पंचायत क्षेत्रातील उसप येथे एका बेकायदा चिरेखाणीवर खाण आणि भूगर्भ खात्याने छापा टाकून एका ट्रकसह चिरे काढण्याखाणी वापरण्यात येणारी यंत्रसामग्री जप्त केली. खाण खात्याच्या अधिकाऱ्यांच्या पथकाने पोलिसांच्या उपस्थितीत सोमवारी सायंकाळी ही कारवाई केली.

उसप येथील नियोजित आयडीसी परिसरात डोंगराळ भागात बेकायदा चिरेखाण चालत असल्याची माहिती मिळताच खाण खात्याच्या अधिकाऱ्यांनी या चिरेखाणीवर अचानक छापा टाकला. तेव्हा या चिरेखाणीवर चिरे काढण्याचे काम सुरू होते.

या छाप्यावेळी भरारी पथकाने चिरे काढण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या कटरसह पॉवर टिलर, जनरेटर आदी यंत्रसामग्री तसेच चिऱ्यांची वाहतूक करणारा एक ट्रक जप्त केला. जप्त केलेली यंत्रसामग्री डिचोली पोलिसांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Canada Technology Deal: भारत-कॅनडा टेक डील! विद्यार्थ्यांना मिळणार एआय आणि डेटा सायन्सचे धडे, बंगळुरुमध्ये दीपस्पेशियलचे दोन मोठे करार

Goa Regional Development: गोव्याचे भौतिकशास्त्र आणि राज्यशास्त्र! कॅसिनो, खाणउद्योग अन् विकासाच्या राजकारणाचा वेध

प्रयत्ने साखरेचे कण वेचिता... तक्रारी सोडा, आनंदाचे क्षण निवडा; सुखी आयुष्याचा सुंदर मंत्र!

Egypt Tourism: इजिप्तचा गूढ वारसा! पिरॅमिड्सपासून नाईल नदीपर्यंत; इतिहास, संस्कृती अन् आधुनिकतेचा अद्भुत संगम

JNU Global Reputation: जेएनयूच्या पाण्यात काय आहे?

SCROLL FOR NEXT