Mini Bus Accident At Tilari Ghat Dainik Gomantak
गोवा

Tillari Ghat Accident: चालकाचे नियंत्रण सुटून मिनी बस धडकली ट्रकला; तिलारी घाटातील थरार

Mini Bus Accident At Tilari Ghat: गोव्याच्या दिशेने येणारी मिनी बस आज सकाळी जुन्या अपघातग्रस्त ट्रकवर आदळली. तिलारी घाटातील जयकर पॉईंट येथील अवघड वळणावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने अपघात झाला.

गोमन्तक डिजिटल टीम

Tillari Ghat Accident

पणजी: कर्नाटकातून गोव्याच्या दिशेने येणारी मिनी बस आज सकाळी जुन्या अपघातग्रस्त ट्रकवर आदळली. तिलारी घाटातील जयकर पॉईंट येथील अवघड वळणावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने अपघात झाला. बस धडकून तेथेच थांबल्याने मोठा अनर्थ टळला.

बेळगाव येथील काहीजण मिनी बसने तिलारीमार्गे गोव्यात पर्यटनासाठी येत होते. तिलारी घाट उतरत असताना जयकर पॉईंट येथील अवघड वळणावर चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले. याच ठिकाणी काही महिन्यांपूर्वी अपघातग्रस्त झालेला ट्रक रस्त्याकडेला उभा आहे.

हा ट्रक नेमका ज्या दिशेने दरी आहे, तेथील तुटलेल्या संरक्षक कठड्याला लागून स्थिरावला आहे. या उभ्या असलेल्या ट्रकला मिनी बस जाऊन आदळली. त्यामुळे बस खोल दरीत कोसळण्यापासून बचावली. अपघातग्रस्त ट्रक नसता तर मोठा अनर्थ घडला असता. बसमध्ये सुमारे २० प्रवासी होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Narendra Sawaikar Post Controversy: तरुणांना 'वाळवी' संबोधल्याने गोव्यात राजकीय रणसंग्राम! सावईकरांच्या विधानावर काँग्रेस आक्रमक; माफी मागा, अन्यथा...

Goa Electricity: गोव्यातील वीज ग्राहकांसाठी गूड न्यूज! वीज बिलाचा शॉक टळला; 137 कोटींची तूट सावंत सरकार भरुन काढणार

Goa Air Pollution: वास्को आणि डिचोलीत वाढला प्रदूषणाचा धोका! हवेची गुणवत्ता चिंताजनक पातळीवर; राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाचा धडकी भरवणारा रिपोर्ट

Narendra Sawaikar Post Controversy: 'झुरळांसह वाळवी, देशाला वाचवा'... भाजप नेत्याच्या पोस्टने गोव्यात खळबळ; नरेंद्र सावईकर यांच्या विधानावर विरोधकांचा हल्लाबोल!

Candolim Illegal Road Widening: सलमान खानच्या प्रकल्पासाठी बेकायदेशीर रुंदीकरण? आमदार मायकल लोबो अडचणीत; कांदोळीतील नागरिकांचा खळबळजनक आरोप

SCROLL FOR NEXT