Colvale Police Dainik Gomantak
गोवा

Colvale : कामुर्लीत चिरेखाणींवर छापा; साहित्य जप्त

मामलेदार तसेच खाण खात्याकडून संयुक्त कारवाई

दैनिक गोमन्तक डिजिटल

Colvale : कामुर्ली, बार्देश येथे मामलेदार तसेच खाण खात्याकडून संयुक्त कारवाईअंतर्गत तीन चिरेखाणींवर छापा टाकला. या चिरेखाणी जागेच्या मालकांविरुद्ध कोलवाळ पोलिस स्थानकात गुन्हा नोंदविण्यात आला असून घटनास्थळांवरुन जनरेटर तसेच इतर सामुग्री पोलिसांकडून जप्त करण्यात आली आहे.

उपलब्ध माहितीनुसार, कामुर्ली बार्देश येथे मालमेदार व खाण खात्याने संयुक्त मोहिमेअंतर्गत दोन चिरे खाणींवर छापा टाकला. सर्व्हे क्रमांक 139/0 व सर्व्हे क्र. 151/0 या जागांच्या मालकांविरूद्ध कोलवाळ पोलिसांनी गुन्हा नोंद केल. ही कारवाई गुरूवारी 23 रोजी, मालेदार प्रविण गावस यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली.

मामलेदार कार्यालय, खाण खाते, साबांखा रस्ता विभाग, वाहतूक खात्याचे अधिकारी व कोलवाळ पोलीस या पथकाने वाळू उत्खनन व चिरे खाणी विरोधात खास मोहिम राबवली. या पथकाने प्रथम ओशेल शिवोली येथे शापोरा नदीच्या किनारी छापा टाकला. मात्र, त्या ठिकाणी रेती उत्खनन किंवा रेती साठवून ठेवल्याचे प्रकार आढळले नाहीत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Team India Cricket Schedule: BCCI चा धमाका! टीम इंडियाचं 2026-27 मधील देशातील हंगामाचं वेळापत्रक जाहीर; 17 शहरात रंगणार 22 सामन्यांचा थरार

Israel US Iran War: इराणला मोठा झटका! इस्रायली हल्ल्यात IRGC नौदल प्रमुख अलीरेझा तांगसिरी यांचा मृत्यू; होर्मुझच्या खाडीत तणाव शिगेला

Petrol Diesel Price Hike: इंधन दरवाढीचा सामान्यांना मोठा दणका! 'या' कंपनीकडून पेट्रोल-डिझेलच्या किमतीत भरघोस वाढ; अफवांनी पंपांवर रांगाच-रांगा

Israel US Iran War: मध्य पूर्वेतील युद्धाच्या धामधुमीत भारताची मोठी खेळी! डॉलरची 'दादागिरी' संपवण्यासाठी रुपयाचा मास्टरस्ट्रोक; जगाचे विस्फारले डोळे

VIDEO: ट्रम्प यांना 'इराणीं'शी बोलायचंय? 'त्या' विधानावर मिश्किल टीका करणारा बोमन इराणींचा भन्नाट व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT