Mineral Transport Dainik Gomantak
गोवा

Mineral Transport : खनिज वाहतुकीवरून ग्रामसभा तापली

Mineral Transport Bicholim : पिळगाव पंचायत ः बेकायदा वाहतूक बंद करण्याची ग्रामस्थांची मागणी

गोमन्तक डिजिटल टीम

डिचोली, खनिज वाहतुकीच्या मुद्यावरून पिळगाव पंचायतीची आजची ग्रामसभा काहीसी तापली.

पिळगाव - सारमानसमार्गे चालू असलेली ‘वेदांता’ची खनिज वाहतूक बेकायदेशीर असल्याचा दावा ग्रामस्थांनी ग्रामसभेत करून सध्या चालू असलेली खनिज वाहतूक बंद करा अशी मागणी केली, तर खनिज वाहतूक सुरू करताना ‘वेदांता’ कंपनीने पंचायतीला कल्पना दिलेली नाही, असे स्पष्टीकरण सरपंचांनी या मागणीवेळी दिले.

पिळगाव पंचायतीची ग्रामसभा आज (रविवारी) सरपंच मोहिनी जल्मी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या ग्रामसभेस उपसरपंच सुनील वायंगणकर यांच्यासह उमाकांत परब गावकर, सोनिया बेतकीकर, चेतन खोडगिणकर, शर्मिला वालावलकर आणि स्वप्नील फडते हे सर्व पंच सदस्य उपस्थित होते.

सरपंच मोहिनी जल्मी यांनी स्वागत केल्यानंतर पंचायत सचिवांनी मागील ग्रामसभेचे इतिवृत्त सादर केले. सकाळी १०.३० वाजता सुरू झालेली ही ग्रामसभा दुपारी साधारण पाऊण वाजता आटोपली. या ग्रामसभेत रस्त्याच्या बाजूने वाढलेली झुडूपे आदी गावातील समस्यांवर चर्चा झाली. पावसाळ्यात भेडसावणाऱ्या समस्या दूर करा, अशी मागणीही ग्रामस्थांनी केली.

शेतकऱ्यांची जागा; रस्ता चिखलमय

पिळगाव - सारमानसमार्गे सध्या सुरू असलेली खनिज वाहतूक बेकायदेशीर आहे. शेतकऱ्यांच्या मालमत्तेतून ही खनिज वाहतूक करण्यात येत आहे. सध्या पावसाचे दिवस असल्याने रस्ता चिखलमय बनत आहे आदी मुद्दे अनिल सालेलकर आणि इतरांनी उपस्थित करून खनिज वाहतूक बंद करा, अशी मागणी केली.

खाण व्यवसाय आणि खनिज वाहतूक सुरू करताना ‘वेदांता’ कंपनीने पंचायतीला विश्वासात घेतलेले नाही. पंचायत ग्रामस्थांच्या पाठीशी आहे. शेतकरी आणि ग्रामस्थांच्या मागणीनुसार पंचायत आवश्यक ती पावले उचलणार. पिळगावमधील कामगार आणि शेतकऱ्यांना न्याय मिळालाच पाहिजे.

- मोहिनी जल्मी, सरपंच, पिळगाव

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ramayana Trailer Reaction: 'रामायण: पार्ट 1'च्या ट्रेलरची चर्चा! रणबीरचं तेजस्वी रूप अन् यशचा रौद्र अवतार, चाहते मात्र नाराज; म्हणाले, 'हनुमान कुठे?'

Cutbona Jetty Fishing Season: कुटबण जेटीवर नव्या मासेमारी हंगामाची लगबग; हवामान, मजूर टंचाईची मच्छीमारांनी चिंता व्यक्त केली

Calangute Illegal CRZ Construction: कळंगुटमधील अनधिकृत बांधकामांची 'घटका' जवळ! 'एनजीटी'कडून 'जीसीझेडएमए'चा पाडकाम आदेश कायम

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी अपडेट! वार्षिक वेतनवाढ 3 टक्क्यावरून 5 टक्के होणार? पगारात नेमकी किती वाढ होईल? जाणून घ्या

Goa Illegal liquor Seizure: कोंड्याच्या पोत्यांचा आडोसा अन् दारूची तस्करी! पेरणे अबकारी अधिकाऱ्यांच्या दक्षतेमुळे 3 लाख 78 हजारांचा माल जप्त

SCROLL FOR NEXT