Mulgao Mineral Transport Dainik Gomantak
गोवा

Mulgao: 'मुळगाव' खाणीची होणार पाहणी! खनिज वाहतुकीचा गुंता सोडवण्यासाठी हालचाली; डिचोलीतील बैठकीत निर्णय

Mulgao Mineral Transport: खनिज व्यवसायाला आमचा विरोध नाही, अगोदर गावचे प्रश्न सोडवा, नंतरच खाणीचा विचार कर, अशी मुळगावच्या लोकांची मागणी आहे.

Sameer Panditrao

Mulgao Mining Updates

डिचोली: ‘खनिज’ वाहतुकीवरून मुळगाव गावात निर्माण झालेला गुंता सोडविण्यासाठी प्रशासकीय पातळीवरून प्रयत्न सुरू असून, येत्या शुक्रवारी (ता. २१) रोजी प्रशासनातर्फे मुळगावमधील खाणीची पाहणी करण्यात येणार आहे.

आज (सोमवारी) डिचोलीत झालेल्या एका संयुक्त बैठकीत सर्वानुमते तसा निर्णय झाल्याची माहिती मिळाली आहे. उपजिल्हाधिकारी कार्यालयात आज एक महत्वाची बैठक झाली. नवनियुक्त उपजिल्हाधिकारी खोर्जुवेकर यांच्यासह ‘वेदांता’चे अधिकारी तसेच मुळगाव पंचायत मंडळासह देवस्थान, शेती, कोमुनिदाद चे पदाधिकारी उपस्थित होते.

आधी गावचे प्रश्‍न सोडवा!

खनिज व्यवसायाला आमचा विरोध नाही, अगोदर गावचे प्रश्न सोडवा, नंतरच खाणीचा विचार कर, अशी मुळगावच्या लोकांची मागणी आहे. मुळगावमधील मंदिरांसह घरेदारे, शेती-बागायती, तळी आणि अन्य नैसर्गिक जलसंपदा खाण लीज क्षेत्रातून बाहेर काढा. नैसर्गिक वैभव जपून गावचे अस्तित्व सांभाळा. शेतकऱ्यांचे प्रलंबित प्रश्‍न सोडवा.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT