Mulgao: मुळगावात नागरिकांची पुन्हा खाणीवर धडक! मशिनरी, वाहने रोखून धरली; 'वेदांता' अधिकाऱ्यांच्या आश्वासनानंतर ग्रामस्थ माघारी

Mulgao Mining Dispute: मुळगावचे लोक खाणीवर जमा झाल्याची माहिती मिळताच, कंपनीचे अधिकारी खाणीवर दाखल झाले.
Mulgao Mining  Updates
Mulgao Mining DisputeDainik Gomantak
Published on
Updated on

Mulgao Mining Updates

डिचोली: खनिजप्रश्नी मुळगावात निर्माण झालेला वाद शमता शमत नाही. विरोध डावलून खाण व्यवसाय सुरू असल्याचा दावा करीत आज (शुक्रवारी) सायंकाळी मुळगावच्या काही जागृत नागरिकांनी खाणीवर धडक दिली.

दरम्यान, खनिजप्रश्नी तोडगा काढण्यासाठी येत्या २० रोजी ग्रामस्थांबरोबर बैठक घेण्यात येईल. तोपर्यंत खाणीवरील कामकाज बंद ठेवण्यात येईल, अशी ग्वाही ‘वेदांता’च्या अधिकाऱ्यांनी देताच खाणीवर जमा झालेले ग्रामस्थ रात्री उशिरा माघारी परतले.

मुळगावचे लोक खाणीवर जमा झाल्याची माहिती मिळताच, कंपनीचे अधिकारी खाणीवर दाखल झाले. याप्रश्नी खाण कंपनीच्या अधिकाऱ्यांबरोबर रात्री उशिरापर्यंत ग्रामस्थांची चर्चा चालू होती. गावचे प्रश्न सुटेपर्यंत मुळगावची खाण बंद ठेवा अशी मागणी करीत बारा दिवसांपूर्वी गेल्या ता. २६ रोजी मुळगाववासीय खाणीवर धडकले होते. याप्रश्नी दुसऱ्याच दिवशी ‘वेदांता’ खाण कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मुळगाव येथे येऊन ग्रामस्थांसह बैठक घेतली होती.

Mulgao Mining  Updates
Mulgao: 'आमका नाका खाण'! मुळगाववासीय आक्रमक; खाणीवर धडक देऊन कामकाज पाडले बंद

ग्रामस्थांची खाणीवर धडक

मुळगावच्या सरपंच मानसी कवठणकर यांच्या नेतृत्वाखाली ३० ते ४० ग्रामस्थ आज सायंकाळी खाणीवर धडकले. खनिज व्यवसाय सुरू असल्याचा दावा करीत मुळगावच्या लोकांनी खाणीवरील मशिनरी आणि वाहने रोखून धरली होती. खाण अधिकारी येईपर्यंत खाणीवरून माघारी फिरणार नाही अशी भूमिका लोकांनी घेतली होती. रात्री ९.३० वाजेपर्यंत लोक खाणीवरच होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com