Milind Naik

 

Dainik gomantak

गोवा

मिलिंद नाईक यांच्या अडचणीत वाढ, 'ती' पीडित महिला पोलिसांसमोर हजर

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी या मंत्र्याच्या नावाचा पर्दाफाश केल्यानंतर ताबडतोब मुरगावचे नेते संकल्प आमोणकर यांनी पुराव्यासह मंत्र्याविरुद्ध तक्रार दाखल केली होती

दैनिक गोमन्तक

पणजी : मुरगावचे आमदार व माजी मंत्री मिलिंद नाईक यांच्याविरुद्ध कथित बलात्कारप्रकरणी महिला पोलिस स्थानकात दाखल केलेली तक्रार प्राथमिक चौकशीसाठी खात्याच्या कायदा कक्षाकडे वर्ग करण्यात आली आहे. त्यामध्ये सादर केलेले पुरावे तपासून पाहण्यात येत आहेत. या प्रकरणातील पीडित तरुणीही गोव्यात (goa) दाखल झाली आहे. त्यामुळे तिला चौकशीसाठी पणजी महिला पोलिस बोलवणार का? याकडे लोकांचे लक्ष लागून राहिले आहे.

एक महिन्यापूर्वी काँग्रेसने (Congress) राज्यातील एक मंत्री वासनाकांडात गुंतला असल्याचा आरोप करून राज्यात खळबळ माजवून दिली होती. या घटनेप्रकरणी सरकारला त्या मंत्र्यांविरुद्ध कारवाई करण्याचे आव्हान दिले होते. मात्र, अखेर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर (Girish Chodankar) यांनी या मंत्र्याच्या नावाचा पर्दाफाश केल्यानंतर ताबडतोब मुरगावचे (Mormugao) नेते संकल्प आमोणकर यांनी पुराव्यासह मंत्र्याविरुद्ध तक्रार दाखल केली होती.

ही तक्रार दाखल होऊन पंधरा दिवस उलटले, तरी अजून त्याबाबत कायदा कक्षाच्या अधिकाऱ्यांमार्फत प्राथमिक चौकशी सुरू आहे. जे पुरावे सादर करण्यात आले आहेत, त्याची शहानिशा करण्यात येत आहे. त्यासाठी पीडित तरुणीची चौकशीची शक्यता नाकारता येत नाही. या घटनेशी एका माजी मंत्र्यांचा व सत्ताधारी आमदाराचा (MLA) संबंध असल्याने हे प्रकरण बारकाईने व सर्व बाजू तपासून पाहण्यात येत असल्याचे एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने सांगितले.

या तक्रारीसोबत पोलिसांकडे आमोणकर यांनी पीडित तरुणीचे दोन मोबाईल पुरावे म्हणून सुपूर्द केले आहेत. मात्र, पीडित तरुणीने हे मोबाईल आमोणकर यांनी आपल्याकडून घेऊन ते दोन महिने दिलेच नाही असा दावा केला आहे. तिने हे मोबाईल संकल्प आमोणकर याच्याकडे का दिले होते? तसेच दोन महिने होऊनही परत न केल्याने तिने तेव्हाच त्याच्याविरुद्ध पोलिसांत तक्रार का दाखल केली नव्हती? याप्रकरणीही पोलिस तपास सुरू झाला आहे. त्यामुळे तरुणीला यासंदर्भात स्पष्टीकरण करण्याची वेळ येणार आहे.

मुरगाव पोलिस (police) स्थानकात पीडित तरुणीने दिलेल्या तक्रारीची नोंद करून तपास सुरू झाला आहे. पोलिसांनी तिला वास्कोतील काही ठिकाणी नेऊन काही गोष्टींची खातरजमा करत आहेत. त्यानंतर तिला पोलिसांच्या विविध प्रश्‍नांना उत्तरे देण्याची वेळ येईल ते स्वतःच अडकण्याची शक्यता नाकारता येत नाही. असे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

पीडित तरुणीच्या पतीच्या घातापाताचा संशय

लैंगिक अत्याचाराची तक्रार दाखल झाल्यानंतर संकल्प आमोणकर यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत पीडित तरुणीचा पती हा मुरगाव पालिकेत मजूर म्हणून कामाला होता. त्याला मद्याचे व्यसन होते. रस्त्याने जाताना त्याला पालिकेच्या (Municipality) वाहनाची धडक बसली व त्यामुळे गंभीर जखमी झाला होता. उपचार सुरू असताना त्याचे निधन झाले होते. त्यामुळे हा अपघात की घातपात याबाबतही संशय व्यक्त होत आहे. त्यामुळे यासंदर्भात पोलिस या अपघाताची पुनर्चौकशी करण्याची शक्यता नाकारता येत नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT