...त्यामुळे राज्यात नोकऱ्या फक्त पेडणे तालुक्यात मिळणार: उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर

'मोप विमानतळ, आयुष इस्पितळ यासारखे प्रकल्प आम्ही खेचून आणले असून आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदानही पेडण्यात होणार आहे. त्यामुळे राज्यात नोकऱ्या या फक्त पेडणे (Pernem) तालुक्यात मिळणार आहेत. से प्रतिपादन उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर यांनी केले.
Deputy Chief Minister of Goa: Babu Ajgaonkar

Deputy Chief Minister of Goa: Babu Ajgaonkar

Dainik Gomantak

Babu Ajgaonkar: 'मोप विमानतळ, आयुष इस्पितळ यासारखे प्रकल्प आम्ही खेचून आणले असून आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदानही पेडण्यात होणार आहे. त्यामुळे राज्यात नोकऱ्या या फक्त पेडणे (Pernem) तालुक्यात मिळणार आहेत. अगोदर जमिनी गेलेल्यांना, त्यानंतर गावातील मतदारसंघातील व तालुक्यातील, अशा क्रमाने या नोकऱ्या आमच्या युवकांना मिळतील. स्थानिकांना डावलण्याचा प्रयत्न झाल्यास त्याविरोधात मी दंड थोपटेन. मात्र, इतकी वर्षे कुठे काहीच कार्य न केलेले उमेदवार अळंबी उगवावीत तशी या प्रकल्पावर नजर ठेवून राजकारणात उतरले आहेत', असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर (Deputy Chief Minister Babu Ajgaonkar) यांनी केले.

Deputy Chief Minister of Goa: Babu Ajgaonkar

'भाजपचा पराभव करा, ममताच ठरवणार मुख्यमंत्री'

खारेबांद येथे 34 लाख रुपये खर्च करून बांधण्यात येणाऱ्या संरक्षण भिंतीची पायाभरणी केल्यानंतर ते बोलत होते. या कार्यक्रमाला नगराध्यक्ष उषा नागवेकर उपनगराध्यक्ष मनोज हरमलकर, प्रभागाच्या नगरसेविका आश्विनी पालयेकर, विशाखा गडेकर, राखी कशालकर, तृप्ती सावळ देसाई, नगरसेवक शिवराम तुकोजी, माधव देसाई तसेच अरुण पालयेकर, अभय शेणवी पेडणेकर, प्रकाश पालयेकर, मोहन पालयेकर, कंत्राटदार उमेश परब व ग्रामस्थ उपस्थित होते.

Deputy Chief Minister of Goa: Babu Ajgaonkar

कोकण रेल्‍वेचे ‍विद्युतीकरण मार्च महिन्‍यापर्यंत पूर्णत्वास

उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर पुढे म्हणाले की, 'अळंब्याप्रमाणे अचानक उगवलेल्या या उमेदवारांनी यापूर्वी आपल्या गावात कसले कार्य केले हे कुणाला माहीत नाही. आता तंत्रज्ञान (Technology) इतके प्रगत झालेले आहे की त्याद्वारे मतदार अधिकारी या सर्वांशी त्वरित संपर्क साधता येते. विकास कामांसंबंधी मी कुठेही कमी पडलेलो नाही.' याप्रसंगी नगराध्यक्ष उषा नागवेकर म्हणाल्या की, 'स्थानिक उमेदवार पाहिजे ही मागणी एक षढयंत्र आहे. त्यासाठी मंत्री बाबू आजगावकर यांनी पेडणे मतदारसंघात राहून त्याला उत्तर द्यावे. गेल्या पाच वर्षात मंत्री आजगावकर यांनी मतदारसंघात विकासकामांचा धडाका लावलेला आहे.'

Deputy Chief Minister of Goa: Babu Ajgaonkar

‘झुआरी’ पुलावर वाहतूक कोंडी

कृष्णा पालयेकर म्हणाले की, 'या भागाचे आमदार तथा उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर यांच्या सहकार्यामुळे या प्रभागात गणपती विसर्जन रस्ता, पायऱ्या, आता संरक्षक भिंत व त्यानंतर आणखी एक संरक्षक भिंत होणार आहे. या प्रभागात बरीच कामे त्यांनी हाती घेतली आहेत. त्यामुळे या प्रभागाचा विकास होत आहे.' गौरीश पेडणेकर यांचेही यावेळी भाषण झाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com