Job Scam

 
Dainik Gomantak
गोवा

...त्या सर्व बेकायदेशीर गोष्टीसाठी मिलींद नाईक जबाबदार: परशुराम सोनुर्लेकर

माजी वीजमंत्री मिलिंद नाईक यांच्या कार्यकाळात 2012-2017 या कालावधीत अनेक बेकायदेशीर गोष्टी विभागाकडून केल्या असल्याची माहिती असून, या सर्व बेकायदेशीर गोष्टीसाठी मिलींद नाईक जबाबदार असल्याचा आरोप गोवा फर्स्टचे अध्यक्ष परशुराम सोनुर्लेकर यांनी केला आहे.

Kavya Powar

Job Scam: माजी वीजमंत्री मिलिंद नाईक यांच्या कार्यकाळात 2012-2017 या कालावधीत अनेक बेकायदेशीर गोष्टी विभागाकडून केल्या असल्याची माहिती असून, या सर्व बेकायदेशीर गोष्टीसाठी मिलींद नाईक जबाबदार असल्याचा आरोप गोवा फर्स्टचे अध्यक्ष परशुराम सोनुर्लेकर यांनी केला आहे.

परशुराम सोनुर्लेकर यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत सदर माहिती देताना ते म्हणाले की, 'मिलिंद नाईक (Milind Naik) यांनी आपल्या वीज मंत्रिपदाच्या कार्यकाळात अनेक बेकायदेशीर रित्या नोकरभरती केली असल्याची माहिती हक्क कायद्याअंतर्गत मिळालेल्या माहितीनुसार उघड झाली आहे. 2012-2017 या काळात केलेल्या बेकायदेशीर नोकरभरतीत बहुतेक कर्मचारी त्यांच्या मतदारसंघातील होते. यात त्यांची चुलत बहीण आणि त्यांच्या एका नातेवाईकाला सरकारी नोकरी भरती करण्यात आले. आणि मुरगाव नगरपालिकेच्या माजी नगराध्यक्ष यापैकी एकाच्या पत्नीची वयोमर्यादेच्या वर निवड झाली आहे. तसेच बहुतेक लोकांनी नोकरी मिळवण्यासाठी बनावट अनुभव प्रमाणपत्र सादर केले होते.

या दरम्यान महसूल विभाग देखील स्कॅनरच्या कक्षेत आहे. कारण इतर राज्यातील बहुतेक परप्रांतीय लोक सुद्धा या सरकारी नोकरीसाठी पात्र झाले असल्याचे उघड झाले आहे असे सोनुर्लेकर यांनी सांगितले. या सर्व गोष्टीत मुरगांवचे तत्कालीन मामलेदारांनी याकामी मदत करताना त्यांन जारी केलेल्या गोव्यात गेली 15 वर्षाचे वास्तव्य पूर्ण न केलेल्या वयातील लोकांना 15 वर्षाचा रहिवाशी दाखवला दिला असल्याचे सोनुर्लेकर यांनी सांगताना या सर्व बेकायदेशीर गोष्टीवर आळा घालण्यात वीज विभाग अपयशी ठरला आहे. केवळ मिलींद नाईक यांच्या सांगण्यावरून या लोकांना जाणीवपूर्वक सरकारी नोकरीत समाविष्ट करण्यात आले असल्याचे ते म्हणाले.

या सर्व गोष्टींची चौकशी करून बनावट प्रमाणपत्रासह वीज विभागात रुजू झालेल्या गैर लोकांवर कारवाई करून त्यांना कामावरून कमी करावे अशी मागणी वीजमंत्री निलेश काब्राल यांच्याकडे सोनुर्लेकर यांनी केली आहे. यापूर्वी उच्च न्यायालयाने 30 हून अधिक अश्या बेकायदेशीर नोकरीत भरती झालेल्या लोकांना नोकरीतून कमी करण्याचे आदेश दिला होता असे सोनुर्लेकर यांनी सांगताना बनावट कागदपत्रे सादर करून आणि भ्रष्ट पध्दतीचा वापर करून नोकरी दिलेल्यांना वीज विभागाने न्याय दिल्यास आम्हाला पुन्हा उच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावण्यास भाग पाडले जाईल, असा इशारा गोवा फर्स्टचे अध्यक्ष परशुराम सोनुर्लेकर यांनी दिला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Lavani Marathi Folk Art: शेतातील 'लावण' की सौंदर्याचे 'लावण्य'? मराठी मातीशी जोडलेल्या लावणीची वास्तववादी व्याख्या

Hannah Arendt On Violence: दुष्टता ही राक्षसाकडून नाही तर स्वतंत्र विचार न करणाऱ्या सामान्य माणसाकडून घडते! हॅना आरेन्ट यांचे पथदर्शी विचार

Crime News: "तू तिच्याशी का बोलतोस?" बिअर पार्टीतून सुरू झाला वाद; संतापलेल्या तरुणाने ब्लेडने सपासप वार करत मित्राला संपवलं

Verna: टेम्पोवर कोसळली वीजवाहिनी; छत्तीसगडच्या 30 वर्षीय क्लिनरचा मृत्यू

Shani Vakri 2026: शनिदेवांची उलटी चाल! 'या' राशींना बसणार मोठा आर्थिक फटका; नोकरी-व्यवसायात वाढणार मानसिक ताण

SCROLL FOR NEXT