Michael Lobo News | Goa election result 2022 news updates Dainik Gomantak
गोवा

बार्देशातील सातही ठिकाणी काँग्रेसला यश मिळेल असा दावा: मायकल लोबो

तीन जागांवर पराभव: बार्देशातील चार जागा काँग्रेसकडे

दैनिक गोमन्तक

म्हापसा: बार्देश तालुक्यातील सात विधानसभा मतदारसंघांपैकी कळंगुट, शिवोली, साळगाव व हळदोणे या चार मतदारसंघांवर वर्चस्व स्थापित करण्यात अखेर काँगेसने यश मिळवले आहे. ‘टूगेदर फॉर बार्देश’चे नेते माजी मंत्री मायकल लोबो यांनी काँग्रेसप्रवेश केल्यानंतर बार्देशातील सातही ठिकाणी काँग्रेसला यश मिळेल, असा दावा केला होता. परंतु, त्यांना अंशत: यश लाभले आहेत. (Michael Lobo News)

यासंदर्भात मायकल लोबो तसेच या तालुक्यातील विजयी उमेदवार व पराभूत उमेदवार यांच्या प्रतिक्रिया फोनवरून जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता ते उपलब्ध होऊ शकले नाहीत. विजयी उमेदवार कार्यकर्त्यांच्या गराड्यात होते, तर पराभूत उमेदवारांनी स्वत:चे मोबाईल फोन बंदच केले होते.

तात्पर्य, लोबो यांचा वैयक्तिक करिष्मा कळंगुट मतदारसंघाबरोबरच केवळ शिवोली व साळगाव मतदारसंघांत जाणवला. या तालुक्यातील अन्य मतदारसंघातील अन्य मतदारसंघांत मायकल लोबो घराणेशाहीच्या कारणास्तव काँग्रेसला नुकसानकारकच ठरले असल्याचेही प्रकर्षाने जाणवले. (Goa election result 2022 news updates)

शिवोलीत दिलायलांना यश : दिलायला लोबो यांना शिवोली मतदारसंघातून निवडून आणण्यात मायकल लोबो अखेरीस यशस्वी ठरले. मतमोजणीवेळी प्रारंभीच्या टप्प्यात भाजपचे दयानंद मांद्रेकर आघाडीवर होते; शिवोलीत तीन पंचायती असून, ओशेल, मार्ना-गुडे व सडये या तीन पंचायतींत भाजपने किंचित मताधिक्य मिळवले असले तरी अन्य तीन पंचायतींत दिलायला लोबो यांनीच मोठे मताधिक्य मिळवल्याने त्यांचा विजय सुकर झाला. तथापि, हणजूण-कायसूव, आसगाव-बादें व सर्वांत महत्त्वाचे म्हणजे वेर्ला काणका या पंचायत क्षेत्रात दिलायला यांनी मोठ्या प्रमाणात आघाडी घेतली.

कळंगुटमधून मायकल लोबो यांची हॅटट्रिक!

कळंगूट मतदारसंघात भाजपने सर्व शक्ती पणास लावूनही काँग्रेसचे मायकल लोबो यांनी तिसऱ्यांदा विजय मिळवण्यात बाजी मारली. त्या मतदारसंघात निवडणुकीच्या दरम्यान भाजपबरोबरच तृणमूल काँग्रेस व आपनेही त्यांना फारच पछाडलेले होते. तरीसुद्धा ते सुमारे पाच हजारांचे मताधिक्य घेऊन विजयी झाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ranji Trophy 2024: मोहितचा 'पंजा' अन् फलंदाजांचा जलवा, गोव्यानं उडवला मिझोरामचा धुव्वा; नोंदवला सलग चौथा विजय!

Goa Live Updates: एंटर एअरचे पहिले चार्टर गोव्यात दाखल!

Rajbagh Beach: राजबाग किनाऱ्याने घेतला 'मोकळा श्वास'! पर्यटन खात्याकडून सात बेकायदेशीर बांधकामे उद्ध्वस्त

Goa Onion Rates: कांद्याने आणले डोळ्यात पाणी! नासाडीमुळे दोन दिवसात दरांमध्ये तब्बल २० रुपयांनी वाढ, जाणून घ्या सध्याचा भाव

Margao News: स्वच्छतेसंदर्भात मडगाव पालिकेचा महत्त्वाचा निर्णय; या कारणासाठी नागरिक, पर्यटकांकडून वसूल केला जाईल दंड

SCROLL FOR NEXT