Michael Lobo Saligao Waste Plant Dainik Gomantak
गोवा

Saligao Waste Plant: पर्यटन पट्ट्यात दुर्गंधीचे साम्राज्य! साळगाव कचरा प्रकल्पाच्या ढिसाळ कारभाराचे वास्तव चव्हाट्यावर; मायकल लोबोंनी व्यक्त केली चिंता

Michael Lobo Saligao Waste Plant: साळगाव, कळंगुट आणि कांदोळी परिसरातील रहिवाशांना गेल्या काही दिवसांपासून कचरा प्रकल्पातून येणाऱ्या तीव्र दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे.

दैनिक गोमन्तक डिजिटल

म्हापसा : साळगाव, कळंगुट आणि कांदोळी परिसरातील रहिवाशांना गेल्या काही दिवसांपासून कचरा प्रकल्पातून येणाऱ्या तीव्र दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. या वाढत्या तक्रारींची दखल घेत कळंगुटचे आमदार मायकल लोबो यांनी बुधवारी साळगाव कचरा प्रक्रिया प्रकल्पाची प्रत्यक्ष पाहणी केली. या वेळी त्यांच्यासोबत कळंगुटचे सरपंचांसह इतर स्थानिक लोकप्रतिनिधी उपस्थित होते.

प्रकल्पाचे कामकाज आणि दुर्गंधी येण्यामागची कारणे समजून घेण्यासाठी त्यांनी हा दौरा केला. साळगाव, कळंगुट आणि कांदोळी परिसरातील रहिवाशांना गेल्या काही दिवसांपासून कचरा प्रकल्पातून येणाऱ्या तीव्र दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. या वाढत्या तक्रारींची दखल घेत कळंगुटचे आमदार मायकल लोबो यांनी बुधवारी साळगाव कचरा प्रक्रिया प्रकल्पाची प्रत्यक्ष पाहणी केली.

या वेळी त्यांच्यासोबत कळंगुटचे सरपंचांसह इतर स्थानिक लोकप्रतिनिधी उपस्थित होते. प्रकल्पाचे कामकाज आणि दुर्गंधी येण्यामागची कारणे समजून घेण्यासाठी त्यांनी हा दौरा केला.

पंचायतींची अनास्‍था; लोबो यांचा संताप

अनेक पंचायती आणि नगरपालिका कचऱ्याचे वर्गीकरण न करताच तो सरळ या प्रकल्पात पाठवत आहेत. काही स्थानिक स्वराज्य संस्था या प्रकल्पाचा वापर कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी करण्याऐवजी केवळ ''डम्पिंग ग्राउंड'' (कचरा डेपो) सारखा करत आहेत.

कचरा वर्गीकरणाच्या नियमांचे पालन न करणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांवर कडक कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली. ‘जे स्थानिक निकष पाळत नाहीत आणि मिक्स कचरा पाठवतात, त्यांना मोठा दंड ठोठावला पाहिजे’.

‘कचरा केवळ जेसीबीने ट्रकमध्ये भरणे आणि तो थेट प्रकल्पात आणून टाकणे’, ही पद्धत आता थांबली पाहिजे. प्रत्येकाने उगमस्थानीच (घरोघरी) कचऱ्याचे वर्गीकरण करणे गरजेचे आहे.

प्रकल्पाच्या पारदर्शक कामकाजासाठी आणि उत्तरदायित्वासाठी त्यांनी कचरा प्रकल्पावर देखरेख ठेवणाऱ्या मॉनिटरिंग कमिटीला (निरीक्षण समिती) तातडीने पुन्हा सक्रिय करण्याचे आवाहन केले.

दुर्गंधीमुळे नागरिक कमालीचे त्रस्‍त

पावसाळ्यात या प्रकल्पातून येणाऱ्या दुर्गंधीमुळे स्थानिक नागरिक कमालीचे त्रस्त झाले आहेत. या समस्येवर तातडीने तोडगा काढणे गरजेचे आहे, जेणेकरून जनतेला दिलासा मिळेल आणि हा प्रकल्प दीर्घकाळ टिकून राहील, असे लोबो यांनी शेवटी सांगितले. तसेच सर्व स्थानिक संस्थांनी नियमांचे पालन करून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pilots Dope Test: वैमानिकांची आता वर्षातून एकदा होणार 'डोप टेस्ट'! DGCA लागू करणार नवा नियम; जाणून घ्या काय आहे नवा प्लॅन?

Headland Sada: पोस्ट खात्याची सदनिका बनली शेळ्यांचा निवारा! वर्षानुवर्षे दुर्लक्षामुळे सरकारी इमारत जीर्ण; भंगारवाल्याचाही शिरकाव

Lucky Zodiac Signs 2026: बुधाचे मघा नक्षत्रात गोचर! 'या' लकी राशींवर होणार पैशांचा पाऊस, रक्षाबंधनापर्यंत जॅकपॉट

Colvale Electricity Bills: कोलवाळात वीज बिले दुप्पट-तिप्पट! ग्राहकांना 17 हजारांपर्यंत बिलांचा फटका, फेरपडताळणीची मागणी

Tarun Tejpal Case: तरुण तेजपालला सुप्रीम कोर्टाचा दणका! अधिक वेळ देण्याची याचिका फेटाळली; दोन आठवड्यांत आत्मसमर्पणाचे निर्देश

SCROLL FOR NEXT