Michael Lobo, Rohan Khaunte Dainik Gomantak
गोवा

Goa Tourism: 'जे गोव्यात परतले, त्‍यांचीही पर्यटक म्‍हणून नोंद'! लोबोंचा ‘घरचा आहेर’; पर्यटनमंत्र्यांनी दिला बदनामी न करण्याचा सल्ला

Goa Assembly: लोबोंच्‍या प्रश्‍नाला उत्तर देताना आक्रमक झालेले पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी लोकप्रतिनिधींनी गोव्‍याची बदनामी करू नये, असा सल्ला त्‍यांना दिला.

Sameer Panditrao

पणजी: राज्‍यात येणाऱ्या देशी-विदेशी पर्यटकांच्‍या संख्‍येत मोठी घट झालेली आहे. गोव्‍याबाहेर राहत असलेले जे गोमंतकीय गेल्‍या काही वर्षांत राज्‍यात परतले, त्‍यांचीही ‘पर्यटक’ म्‍हणून नोंद करत पर्यटकांचा आकडा फुगवण्‍यात आला असल्‍याचे सांगून आमदार मायकल लोबो यांनी आपल्‍याच सरकारला ‘घरचा अहेर’ दिला.

मात्र, लोबोंच्‍या प्रश्‍नाला उत्तर देताना आक्रमक झालेले पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी लोकप्रतिनिधींनी गोव्‍याची बदनामी करू नये, असा सल्ला त्‍यांना दिला.

प्रश्‍नोत्तराच्‍या तासाला लोबो यांनी गेल्‍या पाच वर्षांतील आकडेवारी मांडत गोव्‍यात पर्यटकांच्‍या संख्‍येत घट झाल्‍याचा दावा केला. देश-विदेशात स्‍थायिक झालेले अनेक गोमंतकीय कोविड काळात राज्‍यात परतले. त्‍यांचीही नोंद पर्यटन खात्‍याने पर्यटक म्‍हणून केलेली आहे. आम्‍ही इकडे फक्‍त भाषणे देण्‍यासाठी येतो. राज्‍यात पर्यटक का घटत आहेत, याची माहिती सरकारने दिली पाहिजे, अशी मागणीही त्‍यांनी केली.

दरम्‍यान, लोबोंच्‍या प्रश्‍नाला उत्तर देताना पर्यटनमंत्री खंवटे यांनीही गेल्‍या पाच वर्षांतील आकडेवारी सांगून २०१९-२०च्‍या तुलनेत २०२४-२५ मध्‍ये पर्यटकांमध्‍ये किती प्रमाणात वाढ झाली आहे, हे सभागृहाला सांगितले.

आमदारपदी असलेल्‍या लोकप्रतिनिधींनी तसेच गोमंतकीयांनी पर्यटक घटले म्‍हणत गोव्‍याची बदनामी करू नये. विमानांसह रस्‍ते, रेल्‍वे, जलमार्गानेही लाखो पर्यटक दरवर्षी गोव्‍याला भेट देत आहेत. परराज्‍यांतील काही पर्यटक गोव्‍यात येऊन आपल्‍या मित्रांच्‍या गेस्‍टहाऊसवर राहतात. त्‍यांचा डेटा पर्यटन खात्‍याकडे नसल्‍याचेही त्‍यांनी स्‍पष्‍ट केले.

‘पेड इन्‍फ्‍लूएन्‍झर’प्रमाणे वागू नका

परराज्‍यांतील काही ‘पेड इन्‍फ्‍लूएन्‍झर’ तीन-चार महिने गोव्‍यात राहून गोव्‍यातील पर्यटनाची बदनामी करत आहेत. त्‍यांचे प्रमाण वाढत चालले आहे. आता लोकप्रतिनिधींनीही त्‍यांच्‍यासारखे वागू नये. काही सूचना असल्‍यास त्‍या सरकारला कराव्‍यात, त्‍याप्रमाणे पर्यटनात निश्‍चित बदल केले जातील, असे आवाहनही पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी केले.

युरोपियन पर्यटकांना ‘व्‍हिसा ऑन अरायव्‍हल’ द्या!

युरोपियन देशांमधून गोव्‍यात येणाऱ्या पर्यटकांमध्‍ये मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. तेथील पर्यटकांना गोव्‍याकडे आकर्षित करण्‍यासाठी ‘व्‍हिसा ऑन अरायव्‍हल’ची सुविधा देणे गरजेचे आहे.

गोव्‍याचे शिष्‍टमंडळ दिल्लीत नेऊन सरकारने पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे तशी मागणी केली पाहिजे, असे मायकल लोबो म्‍हणाले.

त्‍यावर ‘व्‍हिसा ऑन अरायव्‍हल’चे फायदे तसेच तोटेही असल्‍याचे सांगून याबाबत मुख्‍यमंत्र्यांशी चर्चा करणार असल्‍याचे रोहन खंवटे यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pusapati Ashok Gajapathi Raju: पुसापती अशोक गजपती राजूंनी गोव्याचे राज्यपाल म्हणून स्वीकारली सूत्रे; आंध्रवासीयांच्या आनंदाला भरते

खेळणं म्हणून एक वर्षाच्या मुलाने किंग कोब्राचा घेतला चावा; सापाचा मृत्यू, बाळ सुरक्षित

चप्पलने बडवेन! दिल्लीत मुख्यमंत्री सिद्धरामया आणि शिवकुमार यांचे OSD भिडले; सचिवांनी दिले चौकशीचे आदेश

Shocking Video: चावी फिरवत आली अन् क्षणातच चौथ्या मजल्यावरून मारली उडी; दहावीच्या मुलीनं शाळेतच संपवलं आयुष्य, पाहा थरारक व्हिडिओ

Jasprit Bumrah Retirement: रोहित-विराटनंतर बुमराहही कसोटी क्रिकेटला करणार रामराम? माजी भारतीय खेळाडूच्या विधानाने खळबळ

SCROLL FOR NEXT