Goa Tourism: उन्हाळा असो वा पावसाळा, पर्यटकांच्या मनात 'गोवा'च! 2025 मध्ये 54 लाख पर्यटकांनी गोव्याला दिलीय भेट, आकडेवारी जाहीर

Goa Tourist: २०२५ च्या पहिल्या सहामाहीत गोव्यात तब्बल ५४.५५ लाख पर्यटकांनी भेट दिल्याची अधिकृत आकडेवारी गोवा पर्यटन विभागाने जाहीर केली आहे.
Goa Tourism
Goa TourismDainik Gomantak
Published on
Updated on

बातमीतील ४ महत्त्वाचे मुद्दे खालीलप्रमाणे.

  • २०२५ च्या पहिल्या सहामाहीतील विक्रमी पर्यटन वाढ

  • देशांतर्गत पर्यटकांचा मोठा वाटा

  • जानेवारी महिन्यात सर्वाधिक गर्दी

  • गोव्याच्या आकर्षणाचे मुख्य कारण: किनारे आणि जलक्रीडा

गोवा: देश-विदेशातील पर्यटकांसाठी नेहमीच आकर्षण ठरलेल्या गोव्याने पुन्हा एकदा आपली लोकप्रियता सिद्ध केली आहे. २०२५ च्या पहिल्या सहामाहीत गोव्यात तब्बल ५४.५५ लाख पर्यटकांनी भेट दिल्याची अधिकृत आकडेवारी गोवा पर्यटन विभागाने जाहीर केली आहे. यात ५१.८४ लाख देशांतर्गत पर्यटकांचा समावेश असून, उर्वरित २.७१ लाख पर्यटक हे आंतरराष्ट्रीय असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

विशेष म्हणजे, जानेवारी महिन्यात सर्वाधिक १०.५६ लाख पर्यटकांनी गोव्यातील किनारे, चर्चेस आणि निसर्गसंपन्न परिसरांना भेट दिली. यातील ९.८६ लाख पर्यटक भारतीय, तर ७०,००० परदेशी होते.

फेब्रुवारी महिन्यात ९.०५ लाख पर्यटकांनी गोवा गाठले, त्यात ८.४४ लाख देशांतर्गत आणि ६१,००० आंतरराष्ट्रीय पर्यटकांचा समावेश होता. मार्चमध्ये हा आकडा ८.८९ लाखांवर पोहोचला, ज्यात ८.३२ लाख देशांतर्गत व ५६,००० आंतरराष्ट्रीय पर्यटक होते.

Goa Tourism
Goa: ‘गोवा ऑलिंपिक भवन’ कधी होणार? 5 वर्षांपासून प्रयत्न; केंद्रीयमंत्री नाईक अध्यक्ष असूनही अपयश

उन्हाळ्याच्या दिवसांमध्येही गोव्याची ही क्रेझ कमी झालेली दिसली नाही. एप्रिलमध्ये ८.४२ लाख, मे महिन्यात ९.२७ लाख तर जूनमध्ये ८.३४ लाख पर्यटक गोव्यात आले.या संख्येमध्ये दर महिन्याला सरासरी ८ लाखांहून अधिक देशांतर्गत पर्यटक, तसेच २५,००० ते ३०,००० परदेशी पर्यटकांचा समावेश असल्याचे पर्यटन विभागाच्या आकडेवारीतून दिसते.

२०२५ च्या पहिल्या सहामाहीत गोवा पर्यटनाचा आलेख विक्रमी स्तरावर पोहोचल्याने, गोवा देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय पर्यटनाच्या नकाशावर आपले स्थान भक्कम करत आहे.

गोव्याची ओळख म्हणजे त्याचे स्वच्छ, विस्तीर्ण आणि मनोहारी समुद्रकिनारे. बागा, कळंगुट, हणजूण, कांदोळी, मिरामार आणि कोलवा यांसारखे प्रसिद्ध किनारे पर्यटकांच्या हिट लिस्टमध्ये असतात. पांढऱ्या वाळूत चालत जाण्याचा अनुभव असो, वा सूर्यास्ताचा डोळ्यांनादेखील विसरू न येणारा नजारा. गोव्याचे किनारे प्रत्येकाला आपलंसं करतात. सर्फिंग, जेट स्की, पॅरासेलिंग, बोट राइड, स्कूबा डायविंग अशा जलक्रीडा प्रकारांमुळे हे किनारे थ्रील प्रेमींसाठी पर्वणीच ठरतात.

Goa Tourism
Goa Rain: राज्‍यात पावसाची पुन्‍हा हजेरी! गतवर्षीपेक्षा 34 इंचांची तूट; मुरगावात सर्वात कमी पावसाची नोंद

गोव्यातील नाईटलाईफ म्हणजे ऊर्जा, मस्ती आणि धमाल यांचा अनोखा संगम. पणजी, बागा, अंजुना आणि वागाटोर परिसरातील क्लब्स, बार्स आणि बीच पार्टीज यांची झलक अनुभवण्यासाठी देशविदेशातून पर्यटक येथे गर्दी करतात.

प्रश्न १: २०२५ च्या पहिल्या सहामाहीत एकूण किती पर्यटकांनी गोव्याला भेट दिली?

उत्तर: २०२५ च्या पहिल्या सहामाहीत ५४.५५ लाख (चौप्पन्न लाख पंचावन्न हजार) पर्यटकांनी गोव्याला भेट दिली.

प्रश्न २: गोव्याला भेट दिलेल्या एकूण पर्यटकांपैकी देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय पर्यटकांची संख्या किती होती?

उत्तर: भेट दिलेल्या एकूण पर्यटकांपैकी ५१.८४ लाख (एकावन्न लाख चौऱ्याऐंशी हजार) देशांतर्गत पर्यटक होते, तर २.७१ लाख (दोन लाख एकाहत्तर हजार) आंतरराष्ट्रीय पर्यटक होते.

प्रश्न ३: २०२५ च्या पहिल्या सहामाहीत कोणत्या महिन्यात सर्वाधिक पर्यटकांनी गोव्याला भेट दिली?

उत्तर: जानेवारी २०२५ मध्ये सर्वाधिक, म्हणजे १०.५६ लाख (दहा लाख छप्पन्न हजार) पर्यटकांनी गोव्याला भेट दिली.

प्रश्न ४: गोव्याच्या लोकप्रियतेचे मुख्य कारण काय आहे?

उत्तर: गोव्याच्या लोकप्रियतेचे मुख्य कारण त्याचे स्वच्छ, विस्तीर्ण समुद्रकिनारे आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com