Michael Lobo resigns from BJP Dainik Gomantak
गोवा

काँग्रेसमध्ये प्रवेश करणार का? मायकल लोबो म्हणतात...

लोबो भाजपला सोडचिठ्ठी देणार का? या प्रलंबित प्रश्नाला आज अखेरीस पूर्णविराम लागला.

दैनिक गोमन्तक

पणजी: कळंगुटचे आमदार तथा ग्रामीण विकास मंत्री मायकल लोबो यांनी आज अखेर आपले नाराजीनाट्य संपवत आमदारकीचा व मंत्रिपदाचा राजीनामा दिला. लोबो भाजपला सोडचिठ्ठी देणार का? या प्रलंबित प्रश्नाला आज अखेरीस पूर्णविराम लागला. मुख्यमंत्री कार्यालयात आपला राजीनामा देऊन बाहेर आल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. (Michael Lobo resigns from BJP, likely to join Congress)

ते म्हणाले, "मी मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. मी आशा करतो की कळंगुट येथील लोकं माझ्या निर्णयाचा आदर करतील व भविष्यात मला साथ देतील." तुम्ही काँग्रेस (Congress) पक्षामध्ये सामील होणार का हे विचारले असता लोबो यांनी स्पष्ट उत्तर देण्याचे टाळले. ते म्हणाले, "मी अजून कुठलाही निर्णय घेयलेला नाही. काही राजकीय पक्षांबरोबर माझे बोलणे सुरू आहे. मी ज्या पक्षात जाईन तेथील उमेदवार कसे निवडून आणता येतील याकडे लक्ष केंद्रित करेन."

दरम्यान, मायकल लोबो (Michael Lobo) हे केदार नाईक यांच्या प्रचारात सामील झाले होते. यावर स्पष्टीकरण देताना ते म्हणाले, "केदार नाईक माझा चांगला मित्र आहे म्हणून मी त्याच्या प्रचारात सहभागी झालो." लोबो यांनी कुठल्याही नेत्याचे नाव न घेता भाजपवर (BJP) टीका केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Health Horoscope: साप्ताहिक आरोग्य राशीभविष्य 21 ते 27 सप्टेंबर 2026; 'या' 3 राशींची प्रकृती राहील ठणठणीत, तर काहींना तणाव आणि थकवा सतावण्याची शक्यता

Mahindra Thar 3-Door Facelift: ऑफ-रोडिंगचा दम कायम, पण लूक मॉडर्न! थार येतेय नव्या अवतारात! Roxxची झलक पाहायला मिळणार

Foreign Woman Viral Video: फोटो काढत होती परदेशी महिला, अचानक लोकांनी घेरलं; पुढे जे घडलं ते कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडिओ

क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! Asian Games 2026 मध्ये IND vs PAK महामुकाबला होणार नाही; भारताची श्रीलंकेशी फायनलमध्ये लढत

Low BPची समस्या वारंवार होतेय? चक्कर, थकवा अन् मळमळकडे दुर्लक्ष करू नका; जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

SCROLL FOR NEXT