Michael Lobo News
Michael Lobo News Dainik Gomantak
गोवा

सरकारमध्ये असतो, तर कारवाई झाली असती का?

दैनिक गोमन्तक

पणजी : भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी माझ्याबद्दल केलेल्या विधानासंदर्भात कोणतीही प्रतिक्रिया देणार नाही. परंतु, मला यावर विचारायचे आहे, की सरकारात असतो तर माझ्यावर कारवाई झाली असती का? आणि याचे उत्तर समस्त गोमंतकीयांना माहीत आहे, असे विरोधी पक्षनेते मायकल लोबो म्हणाले. (Michael Lobo News)

मायकल लोबो जेव्हा भाजप सरकारमध्ये मंत्री होते, तेव्हा त्यांनी केलेले बेकायदेशीर कृती आमच्या नजरेत आल्या नव्हत्या. परंतु, आता त्या आल्या आहेत. शहर आणि नगर नियोजन मंत्री विश्‍वजित राणे यांनी घेतलेले निर्णय योग्य आहे, असे सांगून तानावडे यांनी राणे यांची पाठ थोपटली होती.

'माझ्या हॉटेल्सचे कारण पुढे करून माझ्यावर लक्ष्य साधण्याचा प्रयत्‍न आहे. माझ्या हॉटेल्सच्या व्यवस्थापाने कोणत्याही प्रकारचे गैरकृत्य केलेले नाही. सामान ठेवण्यासाठी ताडपत्री लावून शेड केली आहे. हा प्रकार मोठ्या पंचतारांकित हॉटेलमध्ये सुद्धा सुरू आहे. मात्र, मी विरोधात असल्याने शहर आणि नगर नियोजन खात्याच्या नजरेस ते गेले आहे', असे मायकल लोबो यांनी सांगितले.

आज मी विरोधी पक्षनेतेपदी असल्याने माझ्यावर कारवाई केली जात आहे. मी स्पष्टीकरण दिले, तरी आमचे ऐकले जणार नाही. कारण आम्ही विरोधात आहोत. विरोधकांवर राजकीय सूड उगवण्याचे राजकारण सध्या देशात सुरू असून हेच धोरण राज्यातही सुरू असल्याचे दिसून येते, असे मायकल लोबो यांनी सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Derogatory Comment on Shantadurga Kunkalikarin: श्रेया धारगळकर, नमिता फातर्फेकरला 4 दिवसांची पोलीस कोठडी!

Damodar Sal Margao: पोलिसांनीच लपवली चोरी? तीन महिन्यांपूर्वी श्री दामबाबच्या अंगावरील दागिने पळवणारा चोरटा अटकेत

Goa Top News: दामोदराच्या सालात चोरी, श्रेया, नमिताला पोलिस कोठडी; राज्यातील ठळक बातम्यांचा आढावा

Goa Unseasonal Rain: गोव्याला अवकाळीचा फटका; 15 दिवसांत पडझडीचे 130 कॉल्स, 34 लाखांचे नुकसान

Women In Goa Startup: देशापेक्षा गोव्याची सरासरी अधिक; स्टार्टअपमध्ये महिलांचा डंका

SCROLL FOR NEXT