Michael Lobo : गोव्यातील काँग्रेस नेते आणि कळंगुटचे आमदार मायकल लोबो गोव्यात परतले आहेत. दिल्लीवरून गोव्यात दाखल झालेल्या लोबोंनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतल्याची जोरदार चर्चा सध्या गोव्यातील राजकीय वर्तुळात सुरु आहे. मात्र लोबोंनी अशा कोणत्याही भेटीची शक्यता फेटाळली आहे. आपण भाजपच्या कोणत्याही नेत्याला भेटायला गेलो नव्हतो असा दावाच लोबोंनी केला आहे.
मायकल लोबो यांनी आपण दिल्लीत महंगाई पे हल्लाबोल रॅलीसाठी दिल्लीत गेल्याचं म्हटलं आहे. मात्र लोबोंच्या दिल्लीवारीने अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत. ऑपरेशन लोटससाठी मायकल लोबोंना दिल्लीतील भाजप पक्षश्रेष्ठींनी बोलावणं पाठवल्याचं बोललं जात आहे. तसंच त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतल्याचंही सध्या चर्चेत आहे. मायकल लोबोंनी जरी या सर्व चर्चा फेटाळल्या असल्या तरीही रामलीला मैदानावर काँग्रेसने आयोजित केलेल्या रॅलीत लोबो दिसले नाहीत. त्यामुळे लोबोंच्या दिल्लीवारीबद्दल गूढ आणखी वाढलं आहे.
दुसरीकडे विधानसभा अधिवेशनापूर्वी अयशस्वी झालेल्या भारतीय जनता पक्षाच्या ‘मिशन लोटस’च्या शिडात पुन्हा हवा भरण्यात येत आहे. पितृपक्ष पंधरवडा सुरू होण्यापूर्वी ते यशस्वी करण्यासाठी प्रयत्न सुरू झाल्याची माहिती आहे. पण सुत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, भारतीय जनता पक्षाला माजी मुख्यमंत्री तथा आमदार दिंगबर कामत हे पक्षामध्ये नको आहेत. त्यांना वगळून आठ आमदार गळाला लावण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. यामुळे ‘मिशन लोटस’मध्ये नवा ट्विस्ट निर्माण झाला आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.