Digambar Kamat : भाजपला का नकोत दिगंबर कामत?

दिगंबर कामत वगळता अन्य 8 आमदारांना गळाला लावण्याच्या भाजपच्या प्रयत्नांमुळे ‘मिशन लोटस’मध्ये नवा ट्विस्ट निर्माण झाला आहे.
Digambar Kamat
Digambar KamatDainik Gomantak

Digambar Kamat : विधानसभा अधिवेशनापूर्वी अयशस्वी झालेल्या भारतीय जनता पक्षाच्या ‘मिशन लोटस’च्या शिडात पुन्हा हवा भरण्यात येत आहे. पितृपक्ष पंधरवडा सुरू होण्यापूर्वी ते यशस्वी करण्यासाठी प्रयत्न सुरू झाल्याची माहिती आहे. पण सुत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, भारतीय जनता पक्षाला माजी मुख्यमंत्री तथा आमदार दिंगबर कामत हे पक्षामध्ये नको आहेत. त्यांना वगळून आठ आमदार गळाला लावण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. यामुळे ‘मिशन लोटस’मध्ये नवा ट्विस्ट निर्माण झाला आहे.

राज्यात सर्वत्र गणेश चतुर्थीची धूम आहे. दुसरीकडे चतुर्थीच्या निमित्ताने नेतेमंडळींच्या भेटीगाठीला जोर आला आहे. या ‘मोरया डिप्लोमासी’च्या माध्यमातून ‘मिशन लोटस’ यशस्वी करण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत. यासाठी भाजप आणि काँग्रेसमधील एका गटाकडून मोर्चेबांधणी सुरू आहे. पक्षांतरबंदी कायद्यानुसार दोन तृतीयांश आमदार फुटणे गरजेचे असल्याने सध्या काँग्रेसकडे असलेल्या 11 पैकी 8 आमदारांची नितांत गरज आहे. मागील विधानसभा अधिवेशनापूर्वी 10 जुलै रोजी या ‘जी-7’ गटाने आठव्या आमदाराची मनधारणा करण्याचा खूप प्रयत्न केला होता. मात्र, त्यात त्यांना यश आले नव्हते. आजची परिस्थिती ही तशीच असली तरी हळदोण्याचे आमदार कार्लुस फेरेरा यांना वळवण्यासाठी नव्याने जोरदार प्रयत्न सुरू आहेत. यासाठी विद्यमान विरोधी पक्षनेते मायकल लोबो, केदार नाईक, दिलायला लोबो, राजेश फळदेसाई, संकल्प आमोणकर आणि आलेक्स सिक्वेरा पुढे असल्याची माहिती आहे. तर दुसरीकडे सध्याचे काँग्रेसचे कार्याध्यक्ष युरी आलेमाव, एल्टन डिकास्टा, रुडाल्फ फर्नांडिस यांनी आपण काँग्रेसमध्येच राहणार असल्याचे सांगत मिशन लोटसला साफ नकार दिला आहे.

Digambar Kamat
Goa Government : गोव्यात सरकारी वकिलांना शुल्कापोटी कोट्यवधींची रक्कम अदा

काँग्रेस गटात अस्वस्थता

राष्ट्रीय काँग्रेसच्या वतीने सध्या देशभर भारत जोडो आंदोलन सुरू असून बहुतांश राष्ट्रीय नेते या आंदोलनात सहभागी झाले आहेत. राज्यातील काँग्रेसमधील असंतोषाची जाणीव राष्ट्रीय कार्यकारिणीला झाली असून येत्या 10 किंवा 11 सप्टेंबर रोजी पक्षाचे सरचिटणीस मुकुल वासनिक राज्यात येत आहेत. त्यावेळी नव्या विरोधी पक्षनेत्याची निवड होण्याची शक्यता आहे. तत्पूर्वी मिशन लोटस यशस्वी करण्याची योजना आखली जात आहे.

दुसरीकडे मायकल लोबो काँग्रेसच्या वतीने देशभर सुरू असलेल्या भारत जोडो आंदोलनासाठी दिल्लीला गेचे सांगत आहेत. मात्र, हायकंमाड त्यांच्यावर नाराज असल्याने ते रामलीला मैदानावर उपस्थित नव्हते अशी माहिती सुत्रांनी दिली. तर मग लोबो कुणीकडे गेले होते? याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत. लोबो यांनी शहा यांची भेट घेतल्याचे वृत्त असून आपल्या पत्नीसह ते काँग्रेसचा राजीनामा देणार असल्याचीही माहिती आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com