Michael Lobo Dainik Gomantak
गोवा

Michael Lobo: लोबोंचे कतार प्रेम, 974 स्टेडियमच्या कौतुकावरून लोबो आणि सरदेसाई यांच्यात रंगला सामना

पोलंड विरुद्ध अर्जेंटिना सामन्याला गोव्याचे भाजप आमदार मायकल लोबो यांनी हजेरी लावली.

Pramod Yadav

कतारमध्ये सध्या फिफा फुटबॉल वर्ल्डकप 2022 (Fifa Football Worldcup 2022) सुरू आहे. बुधवारी ग्रुप सी मधील पोलंड विरुद्ध अर्जेंटिना सामना झाला. स्टेडियम 974 येथे झालेल्या या सामन्यात अर्जेंटिनाने 2-0 असा विजय मिळवला. या सामन्याला गोव्याचे भाजप आमदार मायकल लोबो (Michael Lobo) यांनी हजेरी लावली. सामन्यानंतर लोबोंनी 974 स्टेडियमचे कौतुक केले. यावरून गोवा फॉरवर्डचे आमदार विजय (Vijai Sardesai) सरदेसाईंनी लोबो यांनी चिमटा काढला आहे.

झाले असे की पोलंड विरुद्ध अर्जेंटिनाचा सामना 974 स्टेडियममध्ये झाला. सामन्यासाठी मायकल लोबो यांनी सप्तनीक हजेरी लावली. त्यानंतर त्यांनी मैदानाच्या बाहेरून जोडीने फोटो काढला. हे फोटो ट्विट करत लोबो यांनी 974 स्टेडियमचे वैशिष्ट्य सांगितले.

"974 स्टेडियम वास्तुशास्त्राचा चमत्कार आहे. हे स्टेडियम 974 रिसायकल शिपिंग कंटेनरपासून बनवले आहे. स्टेडियम पूर्णपणे खोलून दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरित केले जाऊ शकते. यामुळे हे एक जगातील सर्वात टिकाऊ स्टेडियम आहे." असे ट्विट मायकल लोबो यांनी केले आहे.

लोबो यांच्या ट्विटला आमदार विजय सरदेसाई यांनी रिप्लाई दिला आहे. "स्टेडियमपेक्षा अर्जेंटिना संघाच्या खेळाचा उल्लेख म्हत्वाचा होता. शाहजाहनला जे शक्य होतं त्यानं केलं, हे कतार मॉडेल त्याच्या निविदा प्रक्रियेसाठी ग्राह्य देखील धरले जाणार नाही. आणि तुमच्या सरकारकडे नव्या गोष्टींसाठी पैसा आहे?" असे ट्विट आमदार विजय सरदेसाई यांनी केले आहे.

आमदार विजय सरदेसाई यांनी कला अकादमीच्या कामात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप अनेकवेळा केला आहे. या कामासाठी निविदा प्रक्रिया का राबविण्यात आली नाही? असा प्रश्न त्यांनी वारंवार उपस्थित केला आहे. दरम्यान, विजय सरदेसाई यांनी पुन्हा एकदा काँग्रेसमधून नुकतेच भाजपमध्ये गेलेल्या मायकल लोबो यांच्यावर देखील निशाना साधला आहे. विजय सरदेसाई यांच्या ट्विटनंतर लोबो यांनी मात्र कोणताही रिप्लाई दिलेला नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ferrari Seized: महाराष्ट्रात नोंदणीकृत 7.5 कोटींची 'फेरारी' कर्नाटकमध्ये चालवली म्हणून केली जप्त; काय नेमकं प्रकरण? वाचा

IND Vs ENG: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये टीम इंडियाने रचला इतिहास, परदेशी भूमीवर केली दमदार कामगिरी; कांगारुंचा मोडला रेकॉर्ड

Goa News Live: 54 जुन्या कदंब बस भंगारात; नव्या EV बसेस घेणार जागा

Operation Sindoor: 'भारत पाकिस्तानसोबत चीनशीही लढत होता...' ऑपरेशन सिंदूरबाबत भारतीय उप सेनाप्रमुखांचे मोठे वक्तव्य

BJP: इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे महिलेकडे जाणार? RSS चा ग्रीन सिग्नल; 'ही' तीन नावे चर्चेत

SCROLL FOR NEXT