Goa Congress: गोवा काँग्रेसला उभारी मिळणार का? नव्या चेहऱ्यांसह 14 सरचिटणीस, 5 उपाध्यक्षांची निवड

समितीत एम. के. शेख यांना वरिष्ठ उपाध्यक्षपदी कायम ठेवण्यात आले आहे.
Amit patkar
Amit patkarDainik Gomantak

गोवा प्रदेश काँग्रेसच्या (GPCC) नव्या समितीची घोषणा करण्यात आली आहे. आठ काँग्रेस आमदारांनी बंड केल्यानंतर राज्यातील काँग्रेसची फेररचना करण्यात आली आहे. नुकत्याच जाहीर केलेल्या समितीत नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांच्या नेतृत्वाखाली घोषणा करण्यात आलेल्या समितीत एम. के. शेख यांना वरिष्ठ उपाध्यक्षपदी कायम ठेवण्यात आले आहे.

(INC President Mallikarjun Kharge approves appointment of various office bearers of the Goa Pradesh Congress Committee.)

Amit patkar
Petrol-Diesel Price In Goa: खूशखबर! पेट्रोल-डिझेल होणार स्वस्त, काय आहेत गोव्यातील आजचे इंधनाचे दर

राष्ट्रीय काँग्रेसचे नवे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी गोव्याच्या नव्या समितीला मान्यता दिली आहे.

पाच उपाध्यक्ष

समितीच्या उपाध्यक्षपदी प्रमोद साळगावकर, सुभाष फळदेसाई, तुलियो डिसोझा, सुनील कवठणकर व विठोबा देसाई यांची निवड करण्यात आली आहे.

चौदा सरचिटणीस

इव्हरसन वालीस, विरियातो फर्नांडिस, राजेश वेरेकर, मोरेनो रिबेलो, मनिषा उसगावकर, सावियो डिसोझा, प्रदीप नाईक, श्रीनिवास खलप, जितेंद्र गावकर, जोसेफ वाझ, विजय भिके, वरद म्हार्दोळकर, अर्चित नाईक व रॉयला फर्नांडिस यांची सरचिटणीसपदी निवड करण्यात आली आहे.

GPCC New Committee
GPCC New CommitteeDainik Gomantak
Amit patkar
Ration scam: धान्य तस्करी प्रकरणात क्राईम ब्रँचला न्यायालयाने फटकारले

कार्यकारी समिती

आल्तिन गोम्स, बाबी बागकर, गुरुदास नाटेकर, एल्विस गोम्स, कार्लेस आल्मेदा, विकास प्रभुदेसाई, नितीन चोपडेकर, मेघः श्याम राऊत, नाझिर बेग, शंभू भाऊ बांदेकर, सुनिता वेरेकर, धर्मा चोडणकर, सुरेंद्र फुर्तादो, प्रदीप देसाई यांची नेमणूक झाली आहे.

राजकीय घडामोडी समिती

प्रभारी दिनेश गुंडू राव, प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर, विरोधी पक्षनेते युरी आलेमाव, खासदार फ्रान्सिस सार्दिन, एदुआर्द फालेरी, आमदार कार्लस फेरेरा, आमदार आल्टन डिकॉस्ता, रमाकांत खलप, गिरीश चोडणकर, एम. के. शेख, विर्यातो फर्नांडिस व बीना नाईक यांचा समावेश करण्यात आला आहे. अमरनाथ पणजीकर यांच्याकडे प्रसारमाध्यम विभागाची जबाबदारी देण्यात आली आहे.

तर, खजिनदार म्हणून ऑर्विले दोरादों यांची नेमणूक करण्यात आली आहे. गोवा प्रदेश काँग्रेसमध्ये करण्यात आलेल्या फेरबदलाचा काँग्रेस कसा फायदा होतो हे येत्या काळात स्पष्ट होईल. बंडखोर आमदारांमुळे ढासळलेल्या काँग्रेसला नवी समिती उभारी देणार का हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com