CM Pramod Sawant Dainik Gomantak
गोवा

Mhaje Ghar Yojana: अमित शहा उघडणार 'माझे घर'चे द्वार, 50 टक्‍के गोमंतकीयांना मिळणार लाभ - मुख्‍यमंत्री

Goa housing scheme 2025: 'माझे घर’ योजनेअंतर्गत कोमुनिदाद, सरकारी तसेच खासगी जागेतील घरे कायदेशीर करण्‍याबाबतच्‍या कायद्यांना मंजुरी मिळाल्‍यानंतर त्‍यासंदर्भातील अधिसूचना जारी होत आहेत.

Sameer Amunekar

पणजी: ‘माझे घर’ योजनेअंतर्गत कोमुनिदाद, सरकारी तसेच खासगी जागेतील घरे कायदेशीर करण्‍याबाबतच्‍या कायद्यांना मंजुरी मिळाल्‍यानंतर त्‍यासंदर्भातील अधिसूचना जारी होत आहेत.

ही प्रक्रिया पूर्ण झाल्‍यानंतर अर्ज उपलब्‍ध करून देण्‍यात येतील आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्‍या हस्‍ते या योजनेचा शुभारंभ करण्‍यात येईल. राज्‍यातील सुमारे ५० टक्‍के जनतेला या योजनेचा लाभ मिळेल, असे मुख्‍यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी बुधवारी स्‍पष्‍ट केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्‍या ७५ व्‍या वाढदिवसानिमित्त कला अकादमीत आयोजित राज्‍यस्‍तरीय सेवा पखवाडा कार्यक्रमानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. राज्‍यातील अनेकांची घरे कोमुनिदाद, सरकारी जमिनीवर होती. काहींनी खासगी जागेत बेकायदेशीररित्‍या घरे उभारली होती; परंतु त्‍यांची घरे कायदेशीर झालेली नव्‍हती. अशी घरे कायदेशीर करण्‍यासाठीच सरकारने ‘माझे घर’ योजना सुरू केली.

या योजनेअंतर्गत कोमुनिदाद, सरकारी तसेच खासगी जमिनींवरील घरे कायदेशीर करण्‍यासंदर्भातील कायद्यांना मंजुरी मिळून त्‍याबाबतच्‍या अधिसूचनाही जारी होत आहेत. ही प्रक्रिया पूर्ण झाल्‍यानंतर नागरिकांसाठी अर्ज उपलब्‍ध करून देण्‍यात येतील. त्‍यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्‍या हस्‍ते या योजनेचे शुभारंभ करण्‍यात येईल, असेही मुख्‍यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले.

दरम्‍यान, गत पावसाळी अधिवेशनात सरकारने ‘माझे घर’ योजनेची घोषणा करीत कोमुनिदाद, सरकारी तसेच खासगी जागेतील घरे कायदेशीर करण्‍याबाबतच्‍या विधेयकांना मंजुरी मिळवून घेतली. त्‍यानंतर राज्‍यपालांनाही या विधेयकांना मान्‍यता दिल्‍याने त्‍यांचे कायद्यात रूपांतरण झाले आहे. सरकारच्‍या या योजनेमुळे बेकायदा राहात असलेल्‍यांना दिलासा मिळाला आहे.

‘पुनर्वसन’च्या सदनिका लवकरच नावावर

पुनर्वसन मंडळाने गोमंतकीयांना दिलेल्‍या सदनिका ३० वर्षे झाली, तरी त्‍यांच्‍या नावावर झाल्‍या नव्‍हत्‍या. त्‍यामुळे त्‍या सदनिकांमध्‍ये राहणाऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. अशा सदनिका तेथे राहणाऱ्या कुटुंबांच्‍या नावावर लवकरच करून देण्‍यात येतील, अशी हमीही मुख्‍यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली. यावेळी मुख्‍यमंत्र्यांनी स्वदेशी वापराचा नारा दिला.

स्वयंसाहाय्‍य गटांना ६२ कोटी रुपयांचे कर्ज

गोव्‍यासह देशभरात महिलांसाठी केंद्राने सुरू केलेल्‍या ‘स्‍वस्‍थ नारी, सशक्‍त परिवार’ योजनेचा राज्‍यातील महिलांनी लाभ घ्‍यावा आणि ‍प्राथमिक, सामुदायिक आरोग्‍य केंद्रांमध्‍ये जाऊन शारीरिक तपासणी करून घ्‍यावी, असे आवाहन मुख्‍यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले. कला अकादमीतील राज्‍यस्‍तरीय सेवा पखवाडा कार्यक्रमानंतर पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

सेवा पखवाडा कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्‍हर्च्युअल पद्धतीने नागरिकांशी संवाद साधला. यावेळी मुख्‍यमंत्री सावंत यांच्‍या हस्‍ते विविध महिला स्वयंसाहाय्‍य गटांना ६२ कोटी रुपयांचे कर्ज वितरित करण्यात आले. शिवाय लखपदी दीदी, बँक सखी, उत्‍कृष्‍ट काम केलेले सरकारी कर्मचारी आणि स्‍वयंसेवी संस्‍थांचाही गौरव करण्‍यात आला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Murder Case: घरगुती वादातून काकाचा खून अन् आयुष्याची झाली माती! 29 वर्षाच्या दोषी पुतण्याला कोर्टाचा दणका; ठोठावली जन्मठेपेची शिक्षा

Goa Formula Racing Scam: वीजबिलांचा भार जनतेवर; मोपा येथे महाघोटाळा, सवलतींचा वर्षाव इव्हेंटवर, काँग्रेससह इतर विरोधी पक्षांनीही केला आरोप

Goa Politics: 'आरजी'चा फुटबॉल वीरेशच्या हाती; राष्ट्रीय अध्यक्ष या नात्याने तडकाफडकी राज्य समित्या बरखास्त

Sanjil Kudchadkar Kidnapping Case: कोंब-मडगाव परिसरातील घटनेमुळे खळबळ; कौटुंबिक वादातून पॅथॉलॉजी लॅबचालकाचे अपहरण

Maharashtra FDA Action: तुकाराम मुंढेंचा बॉलिवूडला दणका! गुटख्याची जाहिरात करणाऱ्या सेलिब्रिटींवर होणार कारवाई; एफडीए ॲक्शन मोडवर

SCROLL FOR NEXT