Salary Issue Dainik Gomantak
गोवा

Mhadei Wildlife Sanctuary: म्हादई अभयारण्यातील ट्रेकर्स हवालदिल; तीन महिन्यांपासून खिशात पगार नाही!!

Mhadei Sanctuary Wages Issue: म्हादई अभयारण्य क्षेत्रात काम करणाऱ्या ट्रेकर्स गेल्या ३ महिन्यांपासून पगार मिळालेला नाही.

Akshata Chhatre

वाळपई: सत्तरीतील प्रसिद्ध म्हादई अभयारण्यातील ट्रेकर्सना अजूनही पगार मिळालेला नसल्याने त्यांनी वाळपईचे आमदार, आरोग्यमंत्री विश्वजीत राणे आणि गोवा सरकारकडे लवकरात-लवकर पगार द्यावा अशी मागणी केली आहे. माळोली, नानोडा, बांबर अशा सत्तरी येथील म्हादई अभयारण्य क्षेत्रात काम करणाऱ्या ट्रेकर्स गेल्या ३ महिन्यांपासून पगार मिळालेला नाही.

माळोली येथील म्हादई अभयारण्यात काम सुरु केल्यापासून अनेकजणं या ठिकाणी रोजगारांच्या पगारावर काम करत आहेत. म्हादई येथील ट्रेकर्सनी दिलेल्या माहितीनुसार इथे काम करणाऱ्या कित्येकांना १३ ते १४ वर्ष पुर्ण झालेली आहेत, मात्र तेव्हापासून ते आत्तापर्यंत त्यांना मिळणाऱ्या ४५० रुपयांच्या पगारमध्ये काहीच बदल झालेला नाही.

सुरुवातीला मिळणार ४५० रुपयांची रोजची मजुरी आजही तेवढीच आहे. सध्याची वाढणारी महागाई पाहता या पगारावर जगणं मुश्किल असल्याचं ट्रेकर्स म्हणाले आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून कमी पगारावर काम करत असलेले सर्व कामगार हवालदिल झाले असून वाढत्या महागाईत कसं तग धरावं असा प्रश्न त्यांनी उपस्थित केलाय आणि ते सरकारकडे लवकरच पगार वाढ करावी आणि कायमची नोकरी द्यावी अशी मागणी करत आहेत.

पगार खूप कमी असला तरी देखील तो वेळेवर मिळत नाही अशी व्यथा त्यांनी मांडली. सध्या म्हादई अभयारण्यात दैनंदिन पगारावर काम करणारे एकूण १३० ट्रेकर्स आहेत, ज्यात ६ महिला कर्मचारी देखील आहेत. ट्रेकर्सनी दिलेल्या माहितीनुसार इथे काम करणाऱ्या कोणालाही कायमस्वरुपी किंवा इतर कोणत्याही प्रकारचा भत्ता दिला जात नाही.

म्हादई अभ्यारण्यात काम करताना हे सर्व ट्रेकर्स आपल्या जीवाची पर्वा न करतात काम करतात. जंगलात वाघ, अस्वल अशा प्रकारच्या हिंस्त्र जनावरांचा धोका असतो तरीही ट्रेकर्सच्या सुरक्षेतेसाठी कुठल्याही प्रकारची सुरक्षा यंत्रणा निर्माण केलेली नाही, त्यामुळे या सर्व कामगारांनी त्यांना न्याय मिळवून द्यावा अशी मागणी सरकारकडे धरली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT