Mhadei Wildlife Sanctuary Order : विश्वजीत म्हणतात, निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देणार

तीन महिन्यांत व्याघ्र क्षेत्र अधिसूचित करा : उच्च न्यायालय
Vishwajit P RANE
Vishwajit P RANEDainik Gomantak

Mumbai High Court order on Mhadei Wildlife Sanctuary : म्हादई वन्यजीव अभयारण्य व आजूबाजूचा परिसर व्याघ्र क्षेत्र म्हणून तीन महिन्यात अधिसूचित करण्याचा ऐतिहासिक निवाडा आज मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने देत गोवा सरकारला दणका दिला आहे.

दरम्यान, उच्च न्यायालयाच्या या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देऊ असे वनमंत्री विश्‍वजित राणे यांनी सांगितले.

Vishwajit P RANE
Tillari Dam : तिलारीतून विसर्ग सुरु; उत्तर गोव्याला पूराचा धोका नाही

वन्यजीव मंडळाच्या बैठकीत म्हादई अभयारण्यासह इतर काही परिसर व्याघ्र क्षेत्र घोषित करण्याचा प्रस्ताव सरकारने फेटाळला आहे व सरकार या निर्णयावर ठाम आहे. उच्च न्यायालयाने दिलेल्या निवाड्याचा सविस्तर तपशील अजून हाती लागलेला नाही. त्याची वाट पाहत आहोत. उच्च न्यायालयाच्या या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देऊ असे मंत्री विश्वजित राणे यांनी सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com