Goa Wildlife Sanctuaries: ऑक्टोबरमध्ये गोवा बघायला जाताय? मग 'या' अभयारण्यांना नक्कीच भेट देऊन या!!

Goa October Tour: गोव्यात एकूण 7 अभयारण्य आणि 1 प्राणी संग्रहालय आहे,म्हणूनच गोव्याला येताना निदान 7-10 दिवसांचं प्लॅनिंग असलं पाहिजे.
गोव्यात एकूण 7 अभयारण्य आणि 1 प्राणी संग्रहालय आहे,म्हणूनच गोव्याला येताना निदान 7-10 दिवसांचं प्लॅनिंग असलं पाहिजे.
Goa Wildlife SanctuariesDainik Gomantak
Published on
Updated on

Goa Wildlife Sanctuaries Travel Guide

गोवा: गोव्यात पर्यटनासाठी जात असाल तर काही महत्वाच्या गोष्टी जाणून घ्या. गोवा हे राज्य जरी छोटं असलं तरीही एका दिवसात सगळ्या जागांना भेट देणं शक्य होत नाही आणि घाईगडबडीत महत्वाचे मुद्दे सुटू शकतात, म्हणूनच गोव्याला येताना निदान 7-10 दिवसांचं प्लॅनिंग असलं पाहिजे.

आज आपण गोव्यातील प्राणीसंग्रहालय आणि अभयारण्यांबद्दल जाणून घेणार आहोत. गोव्यात एकूण किती अभयारण्य आहेत, तिथपर्यंत कसं पोहोचायचं, अभयारण्याला भेट देण्याची वेळ काय आहे, एंट्री फी म्हणून किती पैसे द्यावे लागतात अशा अनेक प्रश्नांची उत्तरं आज जाणून घेऊया..

गोव्यात एकूण 7 अभयारण्य आणि 1 प्राणी संग्रहालय आहे. गोवा हे राज्य दोन जिल्ह्यांमध्ये विभागलेलं असल्याने तुमच्या मर्जीप्रमाणे उत्तर किंवा दक्षिण गोव्यातून सुरुवात करता येते.

भगवान महावीर अभयारण्य (Bhagwan Mahaveer Wildlife Sanctuary)

जवळपास 240 चौरस किमी व्यापलेलं भगवान महावीर अभयारण्य हे गोव्यातील सर्वात मोठं अभयारण्य आहे. या अभयारण्यात पर्यटक विविध वनस्पती, वन्यजीव आणि पक्ष्यांची भेट घेऊ शकतात.

हे अभयारण्य राज्याच्या पूर्वेला असलेल्या मोले गावाजवळ आहे. तुम्ही दक्षिण गोवा म्हणजेच मडगाव पासून प्रवास करत असा तर साधारणपणे 53 किमी अंतर पार करावं लागेल आणि पणजीमधून येत असाल तर हे अभयारण्य 54 किमी अंतरावर आहे.

पाहायला गेलं तर या अभयारण्याला वर्षभरात कधीही भेट देता येते, मात्र तुम्हाला निसर्गाची जादू अनुभवाची असेल तर पावसाळ्यात इथे नक्कीच भेट द्यावी. पर्यटकांसाठी हे अभयारण्य सकाळी 8 ते संध्याकाळी 5:30 पर्यंत खुलं असतं.

लहानमुलांसाठी इथे 10 रुपये आकारले जातात तर मोठ्यांसाठी हीच किंमत 20 रुपये आहे. तुम्ही सोबत कॅमेरा नेत असाल तर 30 रुपये आणि व्हिडियो कॅमेरा नेणार असाल तर 150 रुपये भरावे लागतात.

खोतीगाव अभयारण्य (Cotigao Wildlife Sanctuary)

दक्षिण गोव्यातील प्रसिद्ध अभयारण्य म्हणजे खोतीगाव. गोवा आणि कर्नाटकच्या सीमेवर असलेलं हे अभयारण्य गोव्यातील दुसरं सर्वात मोठं अभयारण्य आहे. या अभयारण्याला तुम्ही वर्षभरात कधीही सवडीनुसार भेट देऊ शकता.

इथे रात्रभर मुक्काम करायचं असल्यास उप वनसंरक्षक (मडगाव कार्यालय) कडून परवानगी घेणं आवश्यक आहे. या अभयारण्यात तुम्हाला जास्ती प्रमाणात प्राणी पाहायला मिळणार नाही मात्र वेगवेगळी झाडं आणि रंगेबिरंगी पक्ष्यांचा अनुभव नक्कीच घेऊ शकता.

गोव्यात एकूण 7 अभयारण्य आणि 1 प्राणी संग्रहालय आहे,म्हणूनच गोव्याला येताना निदान 7-10 दिवसांचं प्लॅनिंग असलं पाहिजे.
साक्षरतेत दुसरा क्रमांक असलेल्या राज्याची राष्ट्रीय पातळीवर दर्जात्मक अधोगती का? गोवा विद्यापीठाचं नेमकं काय चुकतयं?

खोतीगाव दक्षिण गोव्यातील काणकोण या तालुक्यात आहे. इथे असलेल्या नद्यांवर प्राणी सकाळ-संध्याकाळ तहान भागवण्यासाठी येतात आणि तेव्हा त्यांचं विहंगम दृश्य पाहता येतं. हे अभयारण्य दररोज सकाळी 7 ते संध्याकाळी 5.30 पर्यंत खुलं असतं.

प्रवेशाची किंमत प्रति व्यक्ती 5 रुपये आहे, तसेच कॅमेऱ्यांसाठी 25 रुपये भरावे लागतात. या अभयारण्यात तुम्ही चार-शिंगी काळवीट, पिट वाइपर, हरणं यांची हालचाल टिपू शकता.

बोंडला प्राणी संग्रहालय ( Bondla Wildlife Sanctuary)

गोव्यातील लहान मुलांमध्ये प्रसिद्ध असलेलं प्राणी संग्रहालय म्हणजे बोंडला. राज्यातील अगदीच छोटंसं हे प्राणी संग्रहालय फोंडा तालुक्यात असून जवळपास 8 चौ. किमी पसरलेलं आहे. परिवारासोबत वेळ घालवायचा असेल आणि सोबत वन्यजीव पाहायचे असतील तर या ठिकाणी नक्कीच भेट द्यावी. दक्षिण गोव्यापासून हे प्राणी संग्रहालय 38 किमी अंतरावर तर उत्तर गोव्यापासून याचे अंतर 50 किमी आहे.

बोंडला प्राणी संग्रहालयाला तुम्ही सकाळी 9 ते संध्याकाळी 5 पर्यंत भेट देऊ शकता. एट्री फी म्हणून 5 रुपये घेतले जातात जे की लहानमुलांसाठी फक्त 2 रुपये आहे.

मात्र तुम्हाला कॅमेरा न्यायचा असेल तर 25 रुपये आणि व्हिडियो कॅमेरा न्यायचा असले तर 100 रुपये भरावे लागतात. बोंडला प्राणी संग्रहालय फार मोठं नाही म्हणून इथे वाघ, काहीसे साप, कोल्हा, हरणं, गवा, मोर जवळून पाहण्याची संधी मिळते.

डॉ. सलीम अली बर्ड सेंचुरी (Dr. Salim Ali Bird Sanctuary)

भारतातील प्रख्यात पक्षीशास्त्रज्ञ डॉ. सलीम मोइझुद्दीन अली यांच्या नावावर असलेले, सलीम अली पक्षी अभयारण्य हे गोव्यातील सर्वात लहान संरक्षित क्षेत्रांपैकी एक आहे. इथे येऊन तुम्ही दुर्मिळ पक्षांची भेट घेऊ शकता.

पणजीपासून सुमारे 15 मिनिटांवर असलेल्या रायबंदर फेरीवरून हा प्रवास सुरु होतो. तुम्हाला होड्यांमधून परिसर दाखवण्यासाठी काही नाविक सज्ज असतात किंवा गोवा सरकारने सुरु केलेल्या होड्यांची मदत घेता येते.

तुम्हाला पक्षयांची विविध चित्रं टिपायचे असतील तर ऑक्टोबर महिन्यात या अभयारण्याला भेट द्या. हे अभयारण्य सकाळी 6 ते संध्याकाळी 6 पर्यंत खुलं असतं. खास करून पहाटे आणि संध्याकाळी सूर्यास्ताच्या वेळी इथे पक्षी पाहायला मिळतात.

या अभयारण्याला भेट देऊन तुम्ही किंगफिशर, गरुड,बगळे,मैना यांसारखे पक्षी पाहू शकता. पक्ष्यांशिवाय अनेकवेळा इथे मडस्कीपर, फिडलर खेकडे, मगर, फ्लाइंग फॉक्स आणि कोल्हे यांचं सुद्धा दर्शन घडू शकतं. शिवाय या अभयारण्यात असलेल्या टेहळणी घरांमधून पक्ष्यांचं निरीक्षण करता येतं.

म्हादई अभयारण्य (Madei Wildlife Sanctuary)

गोव्यात नवीनच ओळख बनवलेलं हे अभयारण्य सत्तरीतील वाळपई या भागाजवळ आहे. या अभयारण्याची एकूण जागा 208 चौ. किमीच्या आसपास असण्याची शक्यता आहे. या अभयारण्याच्या निर्मितीनंतर गोवा हे पश्चिम घाटातील क्षेत्राचे संरक्षण करणारं पाहिलं राज्य ठरलं.

कदाचित तुम्ही प्रोजेक्ट टायगर हे नाव ऐकलं असेल, या अभयारण्याला बंगाली वाघांसाठी ओळखलं जातं आणि प्रोजेक्ट टायगर अंतर्गत इथे व्याघ्र प्रकल्प सुरु करण्याचा विचार आहे. तुम्हाला खास करून वाघ बघायचे असतील तर नक्कीच या अभयारण्याला भेट द्या.

पर्यटकांसाठी इथे काही खासगी रिसॉर्ट्स बांधलेले आहेत आणि या अभयारण्यात फिरताना तुम्ही सोबत एक मार्गदर्शक ठेऊ शकता. ऑक्टोबर ते मार्च इथे भेट देण्याचा उत्तम कालावधी मानला जातो मात्र तुम्हाला पावसाळा अनुभवाचा असेल आणि निसर्गाची मजा घ्यायची असेल तर नक्कीच पावसाळयात इथे येऊन तुम्ही राफ्टिंग टूरचा आनंद मिळवू शकता. ही जागा अशोकाच्या झाडांसाठी बरीच प्रसिद्ध आहे त्यामुळे निसर्ग, वन्यजीव आणि वनस्पती या सर्वांचे घर म्हणून म्हादईला भेट देता येते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com