Waterfall Dainik Gomantak
गोवा

गोव्यातील धोकादायक धबधब्यापाशी 29 जणांवर कारवाई, कर्नाटकच्या पर्यटकांनी तोडला नियम; वनविभागाने दाखवला खाक्या

Surla Jalvani waterfall: म्हादई वन्यजीव अभयारण्यात प्रवेशबंदी असतानाही धबधब्याला भेट दिल्याप्रकरणी वन विभागाने गुरुवारी कर्नाटकातील २९ जणांना ताब्यात घेतले.

Sameer Panditrao

म्हादई वन्यजीव अभयारण्यात प्रवेशबंदी असतानाही धबधब्याला भेट दिल्याप्रकरणी वन विभागाने गुरुवारी कर्नाटकातील २९ जणांना ताब्यात घेतले. ही घटना सुर्ला गावाजवळील जाळवणी धबधब्याच्या परिसरात घडली.

स्थानिक नागरिकांनी प्रतिबंधित भागात काही लोक गेल्याची माहिती दिल्यानंतर वन विभागाच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. तपासादरम्यान कर्नाटकातील बेळगाव व आसपासच्या भागातील २९ जण धबधब्याजवळ आढळून आले. चौकशीत त्यांच्याकडे प्रतिबंधित क्षेत्रात प्रवेशाची कोणतीही परवानगी नसल्याचे स्पष्ट झाले.

सर्वांना चौकशीसाठी वाळपई येथील वन कार्यालयात आणण्यात आले. ताब्यात घेतलेल्या व्यक्तींमध्ये अनेक विद्यार्थी असल्याचे वन अधिकाऱ्यांनी सांगितले. जबाब नोंदवताना काहींनी खोटी नावे सांगितल्यामुळे प्रक्रिया उशिरा पूर्ण झाली. अखेर रात्री उशिरा त्यांची वैयक्तिक जातमुचलक्यावर सुटका करण्यात आली. मात्र पुन्हा अशा प्रकारे नियमांचे उल्लंघन केल्यास कठोर कारवाईचा इशारा देण्यात आला.

म्हादई वन्यजीव अभयारण्याचे रेंज अधिकारी गिरीश बैलुडकर यांनी सांगितले की, जाळवणी धबधबा पर्यटकांसाठी पूर्णपणे बंद आहे. धोकादायक मार्ग, दाट जंगल आणि वन्यप्राण्यांची वर्दळ यामुळे हा परिसर अतिशय जोखमीचा मानला जातो. मागील वर्षी येथे दोन जणांचा बुडून मृत्यू झाला होता आणि मृतदेह बाहेर काढण्यासाठी दोन दिवस लागले होते.

दरम्यान, सोशल मीडियावर व्हायरल होणारे फोटो व व्हिडिओ पाहून अनेकजण धबधब्याकडे आकर्षित होत असल्याचे वन अधिकाऱ्यांनी नमूद केले. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर भविष्यात कडक कारवाई करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Grah Gochar 2026: 1 सप्टेंबरला बनणार 6 शक्तिशाली राजयोग! 'या' राशींची तिजोरी पैशांनी भरणार; होणार अफाट धन वर्षाव

Weather Update: ऑगस्टमध्ये समाधानकारक पाऊस, सर्वाधिक वाळपईत; जुलैमधील पावसाचा तुटवडा मात्र कायम

Marcel Road Issue: माशेलात 'वर्दळीचा' रस्ता धोकादायक, खड्ड्यांमुळे वाहतुकीला अडथळा; पावसात दुचाकीस्वारांसमोर मोठे संकट

Panaji: थकीत घरपट्टीचा फटका भाडेकरूंना; उत्पन्नाचा दाखला मिळविताना भाडेकरूंच्या मुलांची मोठी कसरत

Police Attack Viral Video: पीएसआयचा गळा आवळला, लोखंडी साखळीने हल्ला... लखनऊमध्ये अतिक्रमण हटवताना राडा; दोन महिलांसह 6 जणांना बेड्या

SCROLL FOR NEXT