Yuri Alemao Dainik Gomantak
गोवा

Mhadei River: 'भाजप सरकार अकार्यक्षम'! 'म्हादई' स्पष्टीकरणावरून आलेमाव यांचा हल्लाबोल

Yuri Alemao: तवडकरांच्या स्पष्टीकरणावर विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी टीका केली आहे. त्यांनी भाजप सरकार म्हादईच्या पाणीप्रश्नावर वेळ वाया घालवत असल्याचे म्हटले आहे.

Sameer Panditrao

Yuri Alemao About Mhadei River

पणजी: म्हादईची पाहणी करण्यासाठी आपण कर्नाटकच्या सभापतींकडून परवानगी मागू शकत नाही, असे सभापती रमेश तवडकर यांनी स्पष्ट केले आहे. तवडकरांच्या स्पष्टीकरणावर विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी टीका केली आहे. त्यांनी भाजप सरकार म्हादईच्या पाणीप्रश्नावर वेळ वाया घालवत असल्याचे म्हटले आहे.

युरी यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, सभापतींच्या वक्तव्यामुळे भाजप सरकार अकार्यक्षम असल्याचे स्पष्ट झाले आहे. राज्याची जीवनवाहिनी असलेल्या म्हादईप्रश्नाची सरकारला काहीच फिकीर नाही. जलस्रोतमंत्री सुभाष शिरोडकर यांनी ८ जानेवारी रोजी सभागृह समितीची दुसरी बैठक घेतल्यानंतर सभापतींना कर्नाटकातील आपल्या समकक्षांना पत्र लिहून म्हादई पाहणीसाठी मंजुरी घेण्याची विनंती करू असे म्हटले होते.

या विधानाची आठवण करून देताना युरी म्हणाले, सध्या सभापतींनी जी भूमिका घेतली आहे ती पाहता भाजप सरकारचा खरा चेहरा समोर आला आहे. म्हादईचे पाणी वळविण्याच्या कर्नाटकच्या प्रयत्नांवर पर्यावरणप्रेमी आणि गोमंतकीयांनी चिंता व्यक्त केली आहे, पण आश्चर्याची बाब म्हणजे भाजप सरकारला कर्नाटकच्या कारवायांची फिकीर नाही, असेही युरींनी म्हटले आहे.

‘विलंब करण्यासाठी डावपेच’

सभागृह समितीकडून आपल्याला कोणतेही पत्र आले नसल्याचे तवडकर यांनी प्रसार माध्यमांना सांगितले. म्हादई वादाच्या प्रकरणात आपली कोणतीही भूमिका नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. याचा अर्थ भाजप सरकार पूर्णपणे वेळकाढूपणा करीत आहे. म्हादई वाचवण्याच्या प्रक्रियेला विलंब करण्यासाठीच अनेक डावपेच अवलंबले जात आहेत, असा आरोप युरी आलेमाव यांनी केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pakistan Cricket Team: पाकिस्तान संघात पुन्हा एकदा मोठा फेरबदल! सलमान आगाची कॅप्टन्सी जाणार; 'या' खेळाडूकडे सोपवली जाणार संघाची कमान

Shani Gochar 2026: मोठ्या व्यावसायिक डील अन् पदोन्नतीचा योग! 9 ऑक्टोबरपासून उजळणार 5 राशींचं नशीब; शनीचं नक्षत्र परिवर्तन ठरणार वरदान

Viral Post: सकाळी ऑफिसमध्ये वेलकम, तर दुपारी थेट नोकरीवरून काढलं; जॉइनिंगच्या अवघ्या 4 तासांत महिलेसोबत नेमकं काय घडलं? पोस्ट व्हायरल

सनरूफ, 360-डिग्री कॅमेरा, 10.25 इंच स्क्रीन... Maruti Dzireला टक्कर देण्यासाठी येतेय Tataची नवी Aeris; शुक्रवारी होणार लॉन्च

Asian Games 2026: Chak De India! वादळी खेळाच्या जोरावर भारतानं दक्षिण कोरियाला 8-2 ने लोळवलं; सेमीफायनलचं तिकीट जवळपास पक्कं

SCROLL FOR NEXT