Mhadei River Drowning Case Dainik Gomantak
गोवा

VIDEO: अखेर ‘म्हादईत’ बुडालेल्या तरुणाचा मृतदेह सापडला, घटनेमुळे वाळपईसह मडगावातही हळहळ

Mhadei River Drowning Case: सकाळी साडेअकराच्या सुमारास नवोदय विद्यालयाच्या पलीकडे खडकी गावाजवळ नदीच्या मधोमध माबुलीचा मृतदेह आढळून आला.

गोमन्तक डिजिटल टीम

वाळपई: नवोदय विद्यालयाजवळील म्हादई नदीपात्रात बुडालेल्या मडगाव येथील तरुणाचा मृतदेह सोमवारी सकाळी अथक शोधमोहीमीनंतर सापडला. माबुली पटेल (वय २८, रा. मडगाव) असे मृत तरुणाचे नाव आहे.

माहितीनुसार, माबुली पटेल हा ईदनिमित्त शनिवारी वाळपई येथे नातेवाईकांकडे आला होता. रविवारी सायंकाळी तो मित्रांसह नवोदय विद्यालयाजवळील म्हादई नदीपात्रात आंघोळीसाठी गेला; मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने तो खोल पाण्यात बुडाला.

घटनेची माहिती मिळताच वाळपई अग्निशमन दलाचे जवान तातडीने घटनास्थळी दाखल झाले आणि शोधमोहीम सुरू केली. बोटीच्या सहाय्याने तसेच नदीत उतरून शोधकार्य करण्यात आले; मात्र रात्री उशिरापर्यंत शोध घेऊनही काहीच निष्पन्न झाले नाही. सोमवारी सकाळी पुन्हा पोलिस व अग्निशमन दलाने शोधमोहीम सुरू केली.

अखेर सकाळी साडेअकराच्या सुमारास नवोदय विद्यालयाच्या पलीकडे खडकी गावाजवळ नदीच्या मधोमध माबुलीचा मृतदेह आढळून आला. यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी मृतदेह बाहेर काढून वाळपई पोलिसांच्या स्वाधीन केला. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह गोमेकॉ येथे शवविच्छेदनासाठी पाठविला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

AUS vs BAN: क्रिकेटविश्वात मोठा उलटफेर! बांगलादेशनं बलाढ्य ऑस्ट्रेलियाला 9 विकेट्सनं लोळवलं, 30 मिनिटांत कांगारूंचा खेळ खल्लास Watch Video

Viral Video: मंदिरात दर्शन घेऊन बाहेर आला अन् गर्दीत चप्पल गायब! गोव्याच्या पठ्ठ्यानं थेट 'ChatGPT'ची घेतली मदत; काही क्षणांत... पाहा व्हायरल व्हिडिओ

राजकारणात खळबळ! पक्षाच्या कार्यालयात लटकलेल्या अवस्थेत आढळला नेत्याचा मृतदेह; सुसाइड नोटमध्ये लिहिलं, 'राजकारणात आलो, हीच मोठी चूक'

ICC ODI World Cup 2027: अखेर ठरलं! वनडे वर्ल्ड कपचा थरार 'या' तारखेपासून रंगणार; अंतिम सामन्याचीही तारीख निश्चित

Horoscope: रविवार ठरणार खास! वृषभ-कर्कसह 'या' राशींवर लक्ष्मीची कृपा, घरात सुख-समृद्धी अन् नोकरीत प्रमोशनचे संकेत

SCROLL FOR NEXT