Lok Sabha Election Dainik Gomantak
गोवा

Lok Sabha Election: मगोपचा भाजपला पाठिंबा; समित्या बरखास्त

Lok Sabha Election: महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष आणि भाजप यांच्यातील युतीचा आदर करत आगामी लोकसभा निवडणुकीत भाजप उमेदवारांना पाठिंबा देणार आहे.

दैनिक गोमन्तक

Lok Sabha Election: महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष आणि भाजप यांच्यातील युतीचा आदर करत आगामी लोकसभा निवडणुकीत भाजप उमेदवारांना पाठिंबा देणार आहे. मात्र, नरेश सावळ यांचे मगोपच्या नेत्यांवरील आरोप निराधार आणि चुकीचे असल्याचे एमजीपी नेते दीपक ढवळीकर यांनी म्हटले आहे.

मगोपच्या नेत्यांनी रविवारी पणजीत पत्रकार परिषद घेतली. यावेळी दीपक ढवळीकर यांनी सांगितले की, मगोप त्यांच्या युतीचा आदर करत लोकसभा निवडणुकीत भाजपला पाठिंबा देईल. मतदारसंघ समित्या विसर्जित करण्यात आल्या असून सर्व अधिकार मगोपच्या केंद्रीय समितीकडे ठेवल्याचा खुलासाही त्यांनी केला.

लोकसभा निवडणुकीनंतर पुढील सहा महिन्यांत राज्यभरातील मतदारसंघातील समित्या स्थापन करण्यात येणार आहेत. मी मगोप समर्थकांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंगळवारी जाहीर सभेला उपस्थित राहण्याचे आवाहन करतो.

13 टक्के लोक मगोपसोबत

मगोपच्या मतांच्या संख्येबाबत विचारले असता ढवळीकर म्हणाले की, अजूनही गोव्यातील १३ टक्के लोक जे पेडणे, डिचोली, प्रियोळ, फोंडा भागातील आहेत, ते अजूनही मगोपसोबत आहेत.

2024 च्या लोकसभा निवडणुकीनंतर आम्ही मगोपच्या पुढच्या वाटचालीसाठी आराखडा ठरवू. विधानसभेतील एसटी समाजाच्या राजकीय आरक्षणावर भाष्य करताना ढवळीकर म्हणाले की, गोव्यातील एसटी समाजाला राजकीय आरक्षण मिळालेच पाहिजे. मगोप एसटी समाजाच्या राजकीय आरक्षणाच्या बाजूने आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Virat Kohli: क्रिकेट विश्वात खळबळ! 'हा माझा शेवटचा वनडे वर्ल्ड कप', भारत-वेस्टइंडिज मालिकेपूर्वी किंग कोहलीनं फोडला मोठा बॉम्ब

Goa Agriculture: पिकलेल्या भातशेतीसमोर मोठे संकट, हार्वेस्टिंग मशीनची प्रतीक्षा; मांद्रे-कोरगाव हद्दीतील पीक वाया जाण्‍याची भीती

Asian Games 2026: गोल्डन गर्लज्! रोमहर्षक लढतीत भारताच्या पोरींनी मारली बाजी; इराणची धूळधाण करत पटकावलं 'सुवर्णपदक' VIDEO

Stray Cattle: होंडा-वाळपई मार्गावर भटक्या गुरांचा सुळसुळाट, रात्रीच्‍या वेळी रस्त्यावर ठाण; अपघातांना आमंत्रण, दुचाकीस्‍वारांना धोका

Patto Bridge Security: पाटो पुलावरील सुरक्षेच्या त्रुटींवर 'मानवाधिकार'ची तंबी; सीसीटीव्ही, पथदिवे आणि 24 तास पोलिस गस्तीचे निर्देश

SCROLL FOR NEXT