Deepak Dhavalikar Supports Ritesh Naik Dainik Gomantak
गोवा

Goa Assembly Election: 2027 मध्ये रितेश नाईकच हवेत, मगोचा आग्रह; फोंडा पोटनिवडणुकीच्या रणधुमाळीत दीपक ढवळीकरांचं महत्त्वपूर्ण वक्तव्य

Deepak Dhavalikar Supports Ritesh Naik: २०२७ च्या निवडणुकीतही रितेश नाईक यांनाच उमेदवारी मिळाली पाहिजे, मगो पक्षाच्या रितेश नाईक यांना पूर्ण पाठिंबा आहे, असे मगो पक्षाचे अध्यक्ष अध्यक्ष दीपक ढवळीकर यांनी जाहीर केले.

दैनिक गोमन्तक डिजिटल

फोंडा: मगो पक्ष आणि भारतीय जनता पक्षाच्या युतीमुळे फोंड्यातून भाजपचे उमेदवार रितेश रवी नाईक हे निश्‍चितच निवडून येणार असून कुणीही अफवांवर विश्‍वास ठेवू नये, आता केवळ आठ महिने मिळत असले तरी विकासकामाच्या बळावर पुढील २०२७ च्या निवडणुकीतही रितेश नाईक यांनाच उमेदवारी मिळाली पाहिजे, मगो पक्षाच्या रितेश नाईक यांना पूर्ण पाठिंबा आहे, असे मगो पक्षाचे अध्यक्ष अध्यक्ष दीपक ढवळीकर यांनी जाहीर केले.

फोंड्यातील या पत्रकार परिषदेला भाजपाचे अध्यक्ष दामू नाईक, फोंडा नगराध्यक्ष विरेंद्र ढवळीकर, भाजपा मंडळ अध्यक्ष हरेश नाईक, सरपंच नावेद तहसीलकर, नगरसेवक विश्‍वनाथ दळवी, रॉय नाईक व उपसरपंच साजिदा सय्यद आदी उपस्थित होत्या.

दीपक ढवळीकर म्हणाले की, भाजपाचे फोंड्यातील उमेदवार हे उच्च शिक्षित असून नम्रपणा हा त्यांचा स्थायीभाव आहे, प्रामाणिकपणाच्या आणि भाजप मगो युतीच्या बळावर रितेश नाईक बहुमताने निवडून येईल, असा विश्‍वास व्यक्त करताना काँग्रेसचा उमेदवार काँग्रेसच पाडील, असे त्यांनी स्पष्ट केले.

विश्‍वनाथ दळवी म्हणाले, रितेश नाईक यांच्या पाठीशी भाजप कार्यकर्ते खंबीरपणे उभे असून प्रचंड मतांनी रितेश नाईक निश्‍चितच निवडून येतील, असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला. दामू नाईक म्हणाले, फोंडा मतदारसंघात भाजप आणि मगो युतीने जोरदार प्रचार केला असून प्रत्येक ठिकाणी रितेश नाईक यांना प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे. फोंड्यातील विकासकामांच्या पूर्ततेसाठी रितेश नाईक यांना फोंडेकरांनी प्रचंड मतांनी निवडून द्यावे आणि आपली कामे करून घ्यावी.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT