Goa Assembly Election 2027: विधानसभेसाठी ‘आप’ची युतीकरिता तयारी! वाल्मिकी नाईक यांनी स्पष्ट केली भूमिका Watch Video

Valmiki Naik Goa AAP: समान कार्यक्रम निश्चित करणे आवश्यक असल्याची स्पष्ट भूमिका आपचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष वाल्मिकी नाईक यांनी स्पष्ट केली.
Valmiki Naik Aam Aadmi Party
Valmiki Naik Aam Aadmi PartyDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: आगामी २०२७ च्या विधानसभा निवडणुकांचा विचार करता आम आदमी पक्ष गोव्याच्या भवितव्याशी कोणतीही तडजोड करणार नाही. आपची इतर पक्षाशी युती झाल्यानंतर भाजप विरोधक म्हणून लढताना जागा वाटपावर चर्चा करण्यापूर्वी किमान समान कार्यक्रम निश्चित करणे आवश्यक असल्याची स्पष्ट भूमिका आपचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष वाल्मिकी नाईक यांनी स्पष्ट केली.

नव्याने प्रदेशाध्यक्ष म्हणून निवडल्यानंतर नाईक यांची सोमवारी पत्रकार परिषद झाली. संघटन सचिव प्रशांत नाईक, कार्यकारी अध्यक्ष जर्सन गोम्स, वरिष्ठ उपाध्यक्ष संदीश तेलेकर-देसाई, आमदार कॅप्टन व्हेंझी व्हिएगस आणि आमदार क्रुझ सिल्वा उपस्थित होते.

नाईक यांनी ‘आप’ची येत्या निवडणुकीत आघाडीबाबतची किंवा युतीबाबत भूमिका, पक्षशिस्त आणि पुढील वाटचाल याबाबत भूमिका मांडली. ते म्हणाले, राज्यात सत्ताधारी भाजपला पराभूत करणे हीच ‘आप’ची पहिली प्राथमिकता आहे.

Valmiki Naik Aam Aadmi Party
Goa AAP: ‘आप’ची गोव्यात पडझड का? झेडपी निवडणुकीत झालेले पानिपत कुणामुळे?

मात्र, गोव्याच्या भवितव्याशी तडजोड करून नाही, विरोधक म्हणून जागावाटपावर चर्चा करण्यापूर्वी किमान समान कार्यक्रम निश्चित व्हावा. कारण भ्रष्टाचार, जमीन घोटाळे, टीसीपी कायद्यात बदल, खाण घोटाळे, सेझ घोटाळे आणि कुप्रशासन या मुद्द्यांवर जनतेला स्पष्टता हवी. आपण सत्तेसाठी नव्हे तर गोव्यासाठी लढतो, हे जनतेसमार मांडूया.

Valmiki Naik Aam Aadmi Party
Goa AAP:‘आप’ला गोव्यात लागलेल्या गळतीचे कारण दिल्लीतील नेतृत्व! कार्यकर्त्यांमध्ये बळावली भावना; पक्षाची वाढ खुंटण्याची शक्यता व्यक्त

२०२७ च्या निवडणुकीत आम्ही केवळ आघाडीसाठी खुले नाही, तर पुढाकार घेण्यासही तयार आहोत. मात्र, हा लढा पदांसाठी नव्हे, तर गोव्याकरिता असावा. आमदार सिल्वा यांनी ‘आप’ पारंपरिक राजकारणाला खरा पर्याय देणारा पक्ष आहे. भाजपला सत्तेतून हटवून जनतेचे प्रश्न सोडवायचे असतील, तर ही आघाडी जागांच्या गणितावर नव्हे, तर गोव्याच्या प्रश्नांवर आधारित असली पाहिजे.

-वेन्झी व्हिएगस, आमदार

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com