Vijai Sardesai Dainik Gomantak
गोवा

Goa Politics: 40 आमदारांत ‘मगो’ असेल की नाही, हे जनताच ठरवेल! ‘मगो’ समर्थकांचा हल्लाबोल; सरदेसाईंच्या विधानाचा निषेध

Goa MGP: ‘मगो’च्या पत्रकार परिषदेस सरपंच रामचंद्र नाईक, जिल्हा पंचायत सदस्य गणपत नाईक, प्रिया च्यारी आणि दामोदर नाईक, कार्यकारी अध्यक्ष प्रताप फडते, खजिनदार अनंत नाईक, विशांत नाईक आदींची उपस्थिती होती.

Sameer Panditrao

पणजी: येत्या २०२७ च्या मंत्रिमंडळात सुदिन ढवळीकर किंवा मगोचा एकही आमदार नसेल, असे विधान करणाऱ्या गोवा फॉरवर्डचे आमदार विजय सरदेसाई यांचा मडकई मतदारसंघातील मगो पक्षाच्या विद्यमान आणि माजी जिल्हा पंंचयात सदस्य, बांदोडा सरपंचांनी निषेध केला. दरम्यान, निवडून येणाऱ्या ४० आमदारांत कोण असेल किंवा नसेल, ते ठरविण्याचा अधिकार जनतेला आहे, असेही त्यांनी सांगितले.

‘मगो’च्या येथील कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेस सरपंच रामचंद्र नाईक, जिल्हा पंचायत सदस्य गणपत नाईक, प्रिया च्यारी आणि दामोदर नाईक, कार्यकारी अध्यक्ष प्रताप फडते, खजिनदार अनंत नाईक, विशांत नाईक आदींची उपस्थिती होती.

सरपंच नाईक म्हणाले, सुदिन ढवळीकर यांचा मंत्रिमंडळात कधीच समावेश होणार नाही, या सरदेसाईंच्या वक्तव्याची मडकई मतदारसंघातील मगो पक्षाच्या विद्यमान आणि माजी झेडपी सदस्य निषेध करीत आहोत.

हे विधान केवळ राजकीय विरोधातून केले गेले असून, याला कोणताही वस्तुनिष्ठ आधार नाही. ढवळीकर यांनी राज्याच्या पायाभूत सुविधांच्या विकासासाठी भरीव योगदान दिले आहे, असे मगो नेत्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

राजकीय वाद असू शकतो, परंतु सार्वजनिकरित्या एका ज्येष्ठ नेत्याचा अपमान करणे ही धक्कादायक बाब आहे. सरदेसाईंनी तत्काळ माफी मागावी,अशी मागणीही मगो नेत्यांनी केली आहे. पांडुरंग राऊत अध्यक्ष असताना कार्यकारिणीने घटनेत म्हटले आहे की, पहिल्यांदा निवडून आलेल्या आमदाराने मंत्रिपद स्वीकारू नये. सुदिन ढवळीकर हे कार्यकारिणी सदस्य नाहीत, ते केवळ कार्यकर्ते आहेत.

आरोलकरांना मंत्री केल्यास स्वागतच!

मांद्रेचे आमदार जीत आरोलकर हे चांगले काम करीत आहेत. पक्षाच्या अध्यक्षांनीही त्यांच्या कामाचे कौतुक केले आहे. प्रथम आमदार बनलेल्यांना मंत्री करू नये, असा कार्यकारिणीचा निर्णय आहे. परंतु आरोलकर यांना मुख्यमंत्र्यांनी स्वतः आरोलकर यांना मंत्रिमंडळात घेतले, तर त्या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो, असे खजिनदार नाईक यांनी स्पष्ट केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mumbai Goa Highway Accident: मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात! कारची दुचाकीला धडक, महिलेचा जागीच मृत्यू

Team India: इंग्लंड दौरा संपला, आता टीम इंडिया वेस्ट इंडिजशी करणार दोन हात; मायदेशात खेळणार कसोटी मालिका

Goa Assmbly: थकबाकीदारांसाठी प्रीपेड स्मार्ट मीटर बसवा, आमदार निलेश काब्राल यांची मागणी; वाचा दिवसभरातील घडामोडी

नाव, आडनावात बेकायदेशीरपणे बदल कराल तर खबरदार; तीन वर्षापर्यंत होऊ शकते शिक्षा, अधिवेशनात लक्षवेधी

IND vs ENG: रवींद्र जडेजाची गोलंदाजी अन् जो रुटचा रेकॉर्ड, रचला नवा इतिहास; अशी कामगिरी करणारा ठरला जगातील पहिलाच!

SCROLL FOR NEXT