Vijai Sardesai
Vijai Sardesai Dainik Gomantak

Vijai Sardesai: 'या सरकारचे लक्ष शेतकऱ्यांच्‍या जमिनींवर', सरदेसाईंचा आरोप; सांगेत ‘आमचो आवाज ’ला प्रतिसाद

Amcho Avaz Vijai Sanguem: सरकारचे लक्ष आहे ते शेतकऱ्यांच्‍या जमिनींवर. या सरकारकडून जास्‍त अपेक्षा ठेवू नका, असे अवाहन गोवा फॉरवर्डचे प्रमुख आमदार विजय सरदेसाई यांनी केले.
Published on

सांगे: राज्‍यातील ऊस उत्‍पादकांकडे सरकारचे मुळीच लक्ष नाही. या सरकारचे लक्ष आहे ते शेतकऱ्यांच्‍या जमिनींवर. त्‍यामुळे या सरकारकडून जास्‍त अपेक्षा ठेवू नका, असे अावाहन गोवा फॉरवर्डचे प्रमुख आमदार विजय सरदेसाई यांनी केले.

सांगेत आयोजित ‘आमचो आवाज विजय’ या कार्यक्रमात सरदेसाई बोलत होते. यावेळी व्यासपीठावर नगरसेवक मेशू डिकॉस्‍टा, फौझिया शेख, रुमाल्डो फर्नांडिस, वाडे-कुर्डीचे माजी सरपंच संज्योत पै, संदेश गावकर, विकास भगत, दुर्गादास कामत उपस्थित होते.

यावेळी उपस्थित असलेल्या पैकी संजीवनी साखर कारखाना संधर्भात प्रश्न करताना साखर उत्पादन करणे शक्य नसल्यास सांगे भागात इथेनॉल प्रकल्प सुरु करण्यासाठी प्रयत्न करण्याची मागणी केली असता विजय सरदेसाई म्हणाले की सरकारचे लक्ष ऊस उत्पादकावर नसून शेतकऱ्यांच्या जमिनीवर आहे त्या मुळे या सरकार कडून शेतकऱ्यांना चांगले दिवस नसल्याने स्पष्ट झाले असल्याचे सांगितले.

Vijai Sardesai
Vijai Sardesai: 'काँग्रेससोबत 2027 पर्यंत युती! राहुल गांधींना तसे आश्वासन दिलेय', विजय सरदेसाईंची स्पष्टोक्ती

या कार्यक्रमाला उपस्‍थित शेतकऱ्यांनी ‘संजीवनी’ साखर कारखान्‍याबाबत प्रश्न करताना साखर उत्पादन करणे शक्य नसल्यास सांगे भागात इथेनॉल प्रकल्प सुरू करण्यासाठी प्रयत्न करण्याची मागणी केली. त्‍यावर सरदेसाई यांनी वरील वक्तव्‍य केले.

Vijai Sardesai
Vijai Sardesai: सरदेसाईंच्या मोहिमेमुळे काँग्रेस, आप अस्वस्थ! नाव न घेता युरींचे टीकास्त्र; राजकीय वर्तुळात घमासान

नेत्रावळी येथील राखी प्रभुदेसाई आणि अमित नाईक यांनी आपल्यावर होणाऱ्या हल्ल्यासंदभांत सखोल चौकशी करण्याची मागणी केली. पाजीमळ येथील वन विकास महामंडळात काम करणाऱ्या कामगारांनी आपल्या समस्या सादर केल्या. सानिया कुलासो या महिलेने बेंडवाडा पुलाचे काम बंद असल्याचे निदर्शनास आणून देऊन याबाबत विधानसभेत आवाज काढण्याची मागणी केली. तसेच मारंगण-उगे येथील काही घरापर्यंत जाण्यासाठी रस्ता नसल्याची कैफियत मांडली.दरम्‍यान, विश्‍‍वनाथ नार्वेकर यांनी खाणबंदीचा विषय उपस्‍थित केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com