Deepak Dhavalikar About Uday Bhembre
पणजी: राज्यात घडलेल्या ऐतिहासिक ‘सार्वमता’वर मगोपच्या नेत्यांनी वारंवार भूमिका स्पष्ट केली आहे. त्यानंतर पन्नास वर्षांचा काळ लोटला आहे. माजी मुख्यमंत्री भाऊसाहेब बांदोडकर यांचा बहुजनांच्या विकासाचा वारसा मगोपने जोपासला आहे.
बहुजनांनी मुख्य प्रवाहात केलेला प्रवेश काही घटकांना अजूनही रुचत नाही. ‘सार्वमता’वरून पक्षाची वारंवार बदनामी करण्याचे षढयंत्र रचले जात आहे, आता ही बदनामी आम्ही खपवून घेणार नाही. ॲड. उदय भेंब्रे यांनी केलेल्या बदनामीविरोधात पक्षाच्यावतीने कायदेशीर कारवाईची पावले उचलली जातील, अशी माहिती मगोपचे अध्यक्ष दीपक ढवळीकर यांनी ‘गोमन्तक’ला दिली.
यूट्यूबवरील एका खासगी वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात ॲड. भेंब्रे यांनी ‘मगोप’वर टीका केली होती. त्या टीकेवर पक्षाचे अध्यक्ष म्हणून ढवळीकर यांनी वरील प्रतिक्रिया दिली आहे. पक्षाच्या कार्यालयात ॲड. नारायण सावंत, प्रताप फडते आणि अनंत नाईक यांनी पत्रकार परिषद घेऊन ॲड. भेंब्रे यांचा निषेध केला.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.