MGP Goa: 'खंय खाजता आनी खंय खाजयंता'? उदय भेंब्रे पोर्तुगिजांची पिलावळ; 'मगो' नेत्यांची प्रखर टीका

Uday Bhembre Goa: उदय भेंब्रेंसारख्या उच्चविर्णियांनी पोर्तुगिजांशी संगनमत करुन गोव्याच्या बहुजनांचे शोषण केले
goa political news
goa political newsDainik Gomantak
Published on
Updated on

MGP Goa Statement: उदय भेंब्रेंसारख्या उच्चविर्णियांनी पोर्तुगिजांशी संगनमत करुन गोव्याच्या बहुजनांचे शोषण केले. भाऊसाहेबांनी अशा वृत्तींना ठेचण्याचे काम केले म्हणूनच अजूनही त्यांना भाऊसाहेबांचा आदर्श ठेवला जातो असे म्हणत मगोचे नेते अनंत नाईक, एड. नारायण सावंत आणि प्रताप फडते यांनी पत्रकार परिषदेत एड.उदय भ्रेंब्रेचा निषेध केला.

शनिवारी (१ फेब्रुवारी) रोजी झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी काही दिवसांपूर्वी जागर या कार्यक्रमात बोलताना उदय भेंब्रे यांनी महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष किंवा मगो आणि स्वर्गीय भाऊसाहेब बांदोडकर यांच्याविषयी अपमानास्पद शब्दांचा वापर केला होता. याच कार्यक्रमात उदय भेंब्रे यांनी बहुजन समाजाबद्दल एक टिप्पणी केली होती, मात्र आज जर का गोव्यातील बहुजनसमाज खुश असेल तर ते केवळ भाऊसाहेबांमुळेच आहे आणि हातात पद असताना देखील भेंब्रे यांनी बहुजनसमाजासाठी कुठलाही प्रयत्न न केल्याचा आरोप मागो पक्षातर्फे करण्यात आलाय.

गोवामुक्तीनंतर गोव्याला महाराष्ट्रात विलीन करावं की स्वतंत्र राज्य म्हणून घोषित करावं यावर मतदान घेतण्यात आलं होतं, अशा कठीण काळात गोव्यात गरीब जनता आणि बहुजनसमाजाचे जाळ्यात करण्यासाठी भाऊसाहेब प्रयत्न करत होते तर दुसऱ्या बाजूने पद भूषविणारे लोक मात्र पोर्तुगीजांशी संगनमत करण्यात गुंतले असल्याचे रोखठोक विधान देखील मगो पक्षाच्या वतीने करण्यात आले आहे.

goa political news
MGP Goa: ‘बालाजी’नंतर आता भाटीकर? ‘मगोला’ धक्का बसण्याची फोंड्यात चर्चा

आजही उच्चविर्णियांजवळ अमाप जमीन-जुमला आहे आणि याचं प्रमुख कारण म्हणजे पोर्तुगीजांशी केलेली हात मिळवणी, हीच वागणूक भाऊसाहेबांना पटणारी नव्हती म्हणून त्यांनी मगो पक्षाची स्थापना केली असे मत देखील परिषदेत मांडण्यात आले. उदय भेंब्रेच्या म्हणण्यानुसार भाऊसाहेबांनी कधीच भाषेचा किंवा जाती-धर्मांमध्ये भेदभाव केला नाही, मात्र भेंब्रेंसारखी माणसं आजही हे वाद उकरून काढण्याचं प्रमुख कारण आहेत.

एड. नारायण सावंत यांनी मांडलेल्या मतानुसार, ओपिनियन पोलच्या अनेकवर्षांनंतर कुठल्याही राजकीय नेत्याने याचा उल्लेख केला नव्हता, मात्र भेंब्रेंना नेमका कशाचा त्रास होतोय हे समजत नाही. नवीन पिढीला चुकीचा इतिहास सांगणं आणि त्यांचं मन कलुषित करणं हे बरोबर नाही. मगो पक्षाने कधीच कोंकणी भाषेचा विरोध केला नाही, दोन्ही भाषा गोव्याच्या आहेत आणि कुणावरही यापूर्वी जबरदस्ती झालेली नाही आणि यापुढे देखील झाली नाही पाहिजे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com