Bicholim Theft Case Dainik Gomantak
गोवा

Bicholim Theft Case: ऐन चतुर्थीच्या धामधुमीत मेणकुरेत दिवसाढवळ्या घरफोडी; बंद घरातून 15 लाखांचे सोन्याचे दागिने लंपास, 20 जण ताब्यात

Bicholim Theft Case: ऐन चतुर्थीच्या धामधुमीत मेणकुरे येथे दिवसाढवळ्या बंद घर फोडून अज्ञात चोरट्यांनी सुमारे १५ लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने लंपास केले.

गोमंतक ऑनलाईन टीम

डिचोली: ऐन चतुर्थीच्या धामधुमीत मेणकुरे येथे दिवसाढवळ्या बंद घर फोडून अज्ञात चोरट्यांनी सुमारे १५ लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने लंपास केले. भोम परिसरातील रामनाथ (रामू) नाईक यांच्या घरात रविवारी (ता. २२) ही चोरी झाली. याप्रकरणी डिचोली पोलिसांनी गुन्हा नोंद करून तपास सुरू केला आहे. या प्रकरणी सुमारे २० जणांना ताब्यात घेऊन चौकशी करण्यात येत असल्याची माहिती आहे.

रामनाथ नाईक यांच्या मूळ घरी सात दिवसांचा गणपती असल्याने ते कुटुंबीयांसह तेथे गेले होते. त्यांचे नवीन घर सकाळी बंद होते. दुपारी नाईक यांचा पोलिस कॉन्स्टेबल मुलगा घरी आल्यानंतर चोरी झाल्याचे निदर्शनास आले. चोरट्यांनी मागील दरवाजा तोडून घरात प्रवेश केला आणि बेडरूममधील कपाट फोडून मंगळसूत्रासह सोन्याचे दागिने चोरले.

पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून फॉरेन्सिक पथकाच्या मदतीने ठसे घेतले. श्वानपथकही पाचारण करण्यात आले. चोरीचा छडा लावण्यासाठी पोलिसांची विशेष पथके कार्यरत असून, मेणकुरे परिसरातील परप्रांतीय बांधकाम मजुरांची चौकशी सुरू आहे. उत्तर गोव्याचे पोलिस अधीक्षक हरीश मडकईकर, उपअधीक्षक गौरव यादव आणि निरीक्षक विजय राणे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.

पोलिस गस्त वाढवा!

आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये यांनी मेणकुरे पंचायत मंडळासह तपासाची माहिती घेतली. सणासुदीच्या काळात घरे बंद राहत असल्याने मेणकुरे येथे पोलिस गस्त वाढवावी तसेच गावातील परप्रांतीयांची पडताळणी करावी, अशी मागणी पंचायत मंडळाने केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cyber Crime: 'ॲपल सपोर्ट'च्या नावाखाली अमेरिकनांची लूट; बांबोळीतील आलिशान व्हिलावर सायबर पोलिसांचा छापा, 10 जण अटकेत

US Iran Secret Talks: अमेरिका आणि इराण यांच्यात 3 तास सिक्रेट मीटिंग, डोनाल्ड ट्रम्प यांचा तेहरानला थेट आणि खणखणीत इशारा; म्हणाले, 'एक मार्ग विनाशाचा तर...'

Goa Politcs: काँग्रेसने 'गोवा रक्षण यात्रा' नव्हे, 'आमदार राखण यात्रा' काढावी; 'आप'चा खोचक सल्ला, पक्षांतरांवरून निशाणा

Goa Politics: 'गोवा रक्षण यात्रेने फरक पडणार नाही'; 2027नंतरही भाजपचेच सरकार येणार, विश्वजीत राणेंचा दावा

Small Savings Schemes: गुंतवणूकदारांसाठी महत्वाची बातमी! PPF, सुकन्या आणि किसान विकास पत्रच्या व्याजदरांवर 30 सप्टेंबरला मोठा निर्णय; तुमच्या खिशावर काय परिणाम होणार?

SCROLL FOR NEXT