<div class="paragraphs"><p>People of&nbsp;Melauli protesting&nbsp;</p></div>

People of Melauli protesting 

 

Dainik Gomantak

गोवा

मेळावलीतील आंदोलनापुढे सरकारही झुकले

दैनिक गोमन्तक

वाळपई : सत्तरी तालुक्यात 2021 मध्ये झालेले मेळावली आयआयटी विरोधी आंदोलन (Melauli Protest) गाजले. मेळावली सत्तरीत आयआयटीच्या विरोधात न भूतो न भविष्यती असे आंदोलन झाले आणि सरकारला अखेर लोकांनी आयआयटी शैक्षणिक संस्था रद्द करायला भाग पाडले होते. परंतु हे जरी खरे असले, तरी या आंदोलनात अनेक व्यक्तींची भूमिका निर्णायक ठरली आहे.

सुरुवातीला वाळपई (Valpoi) नगरगाव भागातील कायदे पंडितांनी लोकांना वेळीच मार्गदर्शन केल्याने आंदोलनाला योग्य दिशा मिळाली. त्याचबरोबर या व्यक्तींकडे आयआयटी विरोधकांनी देखील संपर्क केला होता. या विरोधकांना या व्यक्तीने आंदोलन कसे असते याची थोडी माहिती दिली आणि आंदोलन करताना कोणताही अनुचित प्रकार होता कामा नये याबाबत सूचना केल्या. त्याचबरोबर अभ्यास केल्याशिवाय आयआयटीच्या (IIT) समर्थनार्थ किंवा विरोधात भूमिका घेणार नाही असेही लोकांना सांगितले. त्यांनी स्वतः त्यांच्या सामाजिक क्षेत्रातील काही विश्वासू माणसे मेळावली गावात पाठवली आणि त्या सामाजिक क्षेत्रातील व्यक्तींना कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार करू नका त्याचबरोबर मीडियाला कोणत्याही प्रकारची वक्तव्ये देऊ नका, असे सूचित केले.

मेळावली गावात एकूण किती गट काम करतात याची माहिती मिळवली. या व्यक्तीने मेळावलीच्या जंगलात नेमके काय काय आहे, आणि जमिनीबाबत लोकांचे अधिकार कसे आहेत हे देखील जाणून घेतले. या आंदोलनाची परिणिती काय होऊ शकते याची कल्पना देखील या व्यक्तीने सरकारपर्यंत पोचविली, परंतु सरकारने या व्यक्तीला केराची टोपली दाखविली. सरकार जेव्हा चुका करत होते. तेव्हा ही व्यक्ती सरकारने त्या चुका करु दे, असेही म्हणत होती. परंतु त्याचबरोबर लोकांनी कोणताही अनुचित प्रकार करु नये या मताची ही व्यक्ती होती. या व्यक्तीचा सामाजिक क्षेत्राशी फार मोठा संबंध आहे आणि गोव्यात ही व्यक्ती अनेक प्रकारे ओळखली जाते. ही व्यक्ती एकदम साधी आणि सरळ आहे असेही म्हणतात. शांत डोक्याने ही व्यक्ती काम करते. मेळावली आंदोलनाच्या (Protest) बाबतीत सरकारच्या गोटात काय चालले आहे याची इत्थंभूत माहिती कायदे पंडितांनी आपल्या हेरांकडून गोळा केली.

राजकीय नेत्यांचे स्वभावही तपासले आणि त्या स्वभावाला अनुसरून ते चुका करत आहेत आणि चुका करतच राहणार आहेत हे देखील जाणले. या व्यक्तीला पोलिस आणि सरकारच्या विविध खात्यातून काही लोक मदत करत होते. मुख्यमंत्री (CM) कार्यालयापेक्षा देखील या व्यक्तीने आपली सीआयडी यंत्रणा तरबेज बनवली होती.

एकंदरीत हालचालीवरून मेळावलीत मोठा अनुचित प्रकार घडू शकतो याची कल्पना या व्यक्तीला अगोदरच आली होती. ही व्यक्ती लोकांमध्ये अजिबात दिसली नाही. ही व्यक्ती आयआयटीला विरोध करते की समर्थन करते हेच समजत नव्हते आणि जेव्हा मेळावली गावावर प्रचंड मोठे संकट येणार आहे आणि यामुळे जीवितहानी देखील होऊ शकते हे समजले आणि या संकटामुळे गावाबरोबरच सरकारी अधिकारी आणि पोलीस (Police) देखील संकटात सापडणार आहेत हे लक्षात येताच या व्यक्तीने आपले ब्रह्मास्त्र काढले.

कायदे पंडित सामाजिक कार्यकर्त्यांनी व्हिडिओ कायदेशीर अभ्यास करून प्रसारित केला. हा व्हिडिओ प्रंचड गाजला आणि या व्हिडिओमुळे अनेकजण गारद झाले. आंदोलनाचे सर्व श्रेय लोकांनाच दिले गेले आहे. आजपर्यंत अशी अनेक आंदोलने यशस्वी केली आहेत.

लोकलढा राहणार सुरूच

सर्वे क्रमांक 67/1 ही जागा अजूनही सरकारने संस्थेकडून ताब्यात घेतलेली नाही. लोकांवरील गुन्हे मागे घेतलेले नाहीत. त्यामुळे लोकांचे दुसऱ्या टप्यातील आंदोलन सुरुच आहे. मेळावली पंचक्रोशी बचाव आंदोलनाअंतर्गत अंतिम लोकलढा सुरुच ठेवला आहे. 2022 मध्येही न्याय मिळेपर्यंत सुरुच राहणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

‘’प्रमोद सावंत सर्वात भ्रष्ट मुख्यमंत्री, त्यांच्या 1000 कोटींच्या घोटाळ्याची चौकशी करा’’; अलका लांबा यांचा हल्लाबोल

Ranbir Alia Video: रणबीरच्या मुंबई सिटीकडून गोव्याचा पराभव, आलियासोबत विजयी जल्लोषाचा व्हिडिओ व्हायरल

Smart City Panaji: स्मार्ट सिटी पणजीच्या खोदकामात आढळली रहस्यमय मूर्ती

Kala Academy: गोविंद गावडे कोणाला वाचवत आहेत? सल्लागाराकडे दाखवले बोट

Economic Crisis: पाकिस्तानचा कैवारी बनणाऱ्या देशाला वाढत्या महागाईनं ग्रासलं; दोन वेळच्या अन्नासाठी जनता करतेय संघर्ष!

SCROLL FOR NEXT