Vishwajit Rane In Morlem  Dainik Gomantak
गोवा

Prashasan Tumchya Daari : राज्यात दोन नर्सिंग कॉलेज सुरू करणार : आरोग्यमंत्री राणे

जनतेला दरवर्षी 120 कोटी रुपयांची मोफत औषधे पुरविणार

दैनिक गोमन्तक डिजिटल

Prashasan Tumchya Daari : ‘प्रशासन तुमच्या दारी’ या उपक्रमानुसार आरोग्य शिबिरे आयोजित करून आरोग्य जनतेच्या दारी पोहोचविण्याचा प्रयत्न सुरू आहे. येणाऱ्या काळात आरोग्य क्षेत्रात मोठा बदल घडवून आणताना युवक-युवतींना आरोग्य क्षेत्रात प्रशिक्षण देण्यासाठी उत्तर व दक्षिण गोवा येथे दोन नर्सिंग कॉलेज सुरू करण्याचा प्रयत्न असणार आहे.

त्यामुळे लाखो रुपये खर्च करून बाहेरच्या राज्यात नर्सिंगचे प्रशिक्षण घेण्यासाठी जाणाऱ्या राज्यातील मुलांची संख्या कमी होणार आहे, असे प्रतिपादन शनिवार, 25 रोजी राज्याचे आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी मोर्ले-सत्तरी येथे आरोग्य शिबिराच्या उद्‌घाटनप्रसंगी केले.

यावेळी गोवा वैद्यकीय महाविद्यालयाचे डीन डॉ. शिवानंद बांदेकर, आरोग्य संचालनालयाच्या संचालक डॉ. गीता काकोडकर, आरोग्यमंत्र्यांच्या सल्लागार डॉ. गीता देशमुख, डॉ. नाईक, केरी जिल्हा पंचायत सदस्य देवयानी गावस, होंडा जिल्हा पंचायत सदस्य सगुण वाडकर, मोर्ले सरपंच अमित शिरोडकर, सामाजिक कार्यकर्ते विनोद शिंदे, तसेच उपसरपंच, पंच व आरोग्य खात्याचे विविध अधिकारी उपस्थित होते.

120 कोटींची मोफत औषधे

गोवा वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात राज्यातील जनतेला दरवर्षी सुमारे 120 कोटी रुपयांची मोफत औषधे पुरविण्यात येत आहेत. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना याचा लाभ होत आहे.

येणाऱ्या काळात याहीपेक्षा जास्त सुविधा जनतेला उपलब्ध करून देण्यासाठी आपण प्रयत्नशील राहणार आहे, असे मंत्री विश्वजीत राणे यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Grah Gochar 2026: 1 सप्टेंबरला बनणार 6 शक्तिशाली राजयोग! 'या' राशींची तिजोरी पैशांनी भरणार; होणार अफाट धन वर्षाव

Weather Update: ऑगस्टमध्ये समाधानकारक पाऊस, सर्वाधिक वाळपईत; जुलैमधील पावसाचा तुटवडा मात्र कायम

Marcel Road Issue: माशेलात 'वर्दळीचा' रस्ता धोकादायक, खड्ड्यांमुळे वाहतुकीला अडथळा; पावसात दुचाकीस्वारांसमोर मोठे संकट

Panaji: थकीत घरपट्टीचा फटका भाडेकरूंना; उत्पन्नाचा दाखला मिळविताना भाडेकरूंच्या मुलांची मोठी कसरत

Police Attack Viral Video: पीएसआयचा गळा आवळला, लोखंडी साखळीने हल्ला... लखनऊमध्ये अतिक्रमण हटवताना राडा; दोन महिलांसह 6 जणांना बेड्या

SCROLL FOR NEXT