Mega Block Dainik Gomantak
गोवा

Railway Mega Block: मडगाव-कुमठा, सिंधुदुर्ग मार्गावर रेल्वेचा 16, 17 रोजी मेगा ब्लॉक

Railway Mega Block: मडगाव ते कुमठा आणि राजापूर रोड ते सिंधुदुर्गदरम्यान 16 व 17 नोव्हेंबर रोजी असे दोन दिवस रेल्वेमार्गाची देखभाल व दुरुस्ती करण्यासाठी कोकण रेल्वेने तीन तास मेगा ब्लॉक जाहीर केला आहे.

दैनिक गोमन्तक

Railway Mega Block: मडगाव ते कुमठा आणि राजापूर रोड ते सिंधुदुर्गदरम्यान 16 व 17 नोव्हेंबर रोजी असे दोन दिवस रेल्वेमार्गाची देखभाल व दुरुस्ती करण्यासाठी कोकण रेल्वेने तीन तास मेगा ब्लॉक जाहीर केला आहे. त्यामुळे खालील प्रवासी गाड्यांवर परिणाम होणार आहे.

मडगाव ते कुमठा मार्गावर 16 रोजी दुपारी 12 ते 3 वाजेपर्यंत मेगा ब्लॉक जाहीर केले आहे. त्यामुळे त्या दिवशी ट्रेन क्रमांक 06602 मंगळुरू ते मडगाव रेल्वे कुमठापर्यंत येणार असून कुमठा ते मडगावदरम्यानचा प्रवास रद्द केला आहे. त्याचप्रमाणे ट्रेन क्रमांक 06601 क्रमांकाची मडगाव ते मंगळुरु प्रवासी गाडी कुमठाहून सुटणार असून मडगाव ते कुमठापर्यंतचा प्रवास रद्द केला आहे.

राजापूर रोड ते सिंधदुर्ग मार्गावर 17 नोव्हेंबर रोजी सकाळी 9.30 ते दुपारी 12 पर्यंत मेगा ब्लॉक जाहीर केले आहे, त्यामुळे ट्रेन क्रमांक 50108 ही मडगाव ते सावंतवाडी प्रवासी रेल्वे मडगावहून 80 मिनिटे उशिरा म्हणजे सकाळी 7.30 वाजता सुटणार आहे.

तसेच ट्रेन क्रमांक 10106 ही सावंतवाडी ते दिवा ही प्रवासी ट्रेन सकाळी 10.45 मिनिटांनी सुटेल.

ट्रेन क्रमांक 10104 मडगाव ते मुंबई सीएसटीएम मांडवी एक्स्प्रेसचे करमळी ते सावंतवाडी दरम्यान २० मिनिटांसाठी, ट्रेन क्रमांक 12051 मुंबई जनशताब्दीचे रत्नागिरी ते राजापूर दरम्यान 20 मिनिटांसाठी्‍. तसेच ट्रेन क्रमांक 22119 मुंबई सीएसएमटी ते मडगाव तेजस एक्स्प्रेसचे रत्नागिरी ते राजापूर दरम्यान 20 मिनिटांसाठी नियमन केले जाईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News Live: 54 जुन्या कदंब बस भंगारात; नव्या EV बसेस घेणार जागा

Operation Sindoor: 'भारत पाकिस्तानसोबत चीनशीही लढत होता...' ऑपरेशन सिंदूरबाबत भारतीय उप सेनाप्रमुखांचे मोठे वक्तव्य

BJP: इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे महिलेकडे जाणार? RSS चा ग्रीन सिग्नल; 'ही' तीन नावे चर्चेत

Goa Athletics: गोव्यात रंगणार 'मनोहर पर्रीकर स्मृती ॲथलेटिक्स स्पर्धा'; तारखा, ठिकाण जाणून घ्या..

Pakistani Team: 'पाकिस्तान' टीम खेळणार भारतात! क्रीडा मंत्रालयाकडून ग्रीन सिग्नल; 2 करंडकांमध्ये घेणार भाग

SCROLL FOR NEXT