वास्को: 3 ऑगस्ट रोजी साजरा होणाऱ्या वास्कोतील प्रसिद्ध श्री दामोदर भजनी सप्ताहाची कायदा सुव्यवस्थेविषयी बैठक रवींद्र भवन बायणा येथे उपजिल्हाधिकारी कार्यालयात संपन्न झाली. अतिरिक्त ताबा घेतलेल्या उपजिल्हाधिकारी स्नेहल प्रभू यांच्या मार्गदर्शनाखाली सदर बैठक संपन्न झाली. सप्ताह काळात थाटण्यात येणारी फेरी दुकाने फक्त सात दिवस ठेवण्याच्या आदेशाबरोबर सप्ताह काळात प्लास्टिक पूर्ण बंदी घालण्याचा आदेशही यावेळी देण्यात आला. (Meeting of Shree Damodar Bhajani week program was held at Baina )
यंदाचा वास्कोचा प्रसिद्ध श्री दामोदर भजनी सप्ताह यंदा होणार की नाही याची उत्सुकता शिगेला पोचली होती. उशिरा का होईना उत्सव समितीने बैठक घेऊन यंदा वास्को सप्ताह कमी प्रमाणात साजरा करण्याचा निर्णय घेतला मात्र सप्ताह काळात फेरी, दुकाने थाटण्याचा निर्णय पालिकेचा असल्याने सदर निर्णय पालिकेवर सोडण्यात आला होता.
पालिका बैठकीत सदर विषय मांडून सप्ताह काळात फेरी भरण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार सात दिवस फेरी भरण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार सात दिवस फेरी भरणार आहे. मंदिरातील धार्मिक विधी व इतर कार्यक्रम उत्सव समितीवर सोपविण्यात आले. त्यानुसार उत्सव समितीने कोविड प्रोटोकॉल पाळून यंदाचा सप्ताह साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे.
दरम्यान यंदा सप्ताह काळात फेरी भरणार असून कायदा सुव्यवस्थेविषयी चर्चा करण्यासाठी उपजिल्हाधिकारी कार्यालयात बैठक बोलवण्यात आली होती. या मामलेदार कार्यालयात पोलीस, सार्वजनिक बांधकाम विभाग, वीज विभाग, अग्निशमन दल, पालिका अधिकाऱ्यांची तसेच उत्सव समितीची संयुक्त बैठक होऊन कायदा सुव्यवस्थेवर चर्चा करण्यात आली.
मुरगाव तालुक्याच्या उपजिल्हाधिकारी स्नेहल प्रभू यांनी या बैठकीत संबंधित अधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. तसेच वेगवेगळ्या सूचना दिल्या. कायदा सुव्यवस्थेत कोणतीही कमतरता भासणार नाही याविषयी आदेश देण्यात आला.
दरम्यान यंदा फक्त सात दिवस फेरी दुकाने थाटण्याची मुभा यावेळी उपजिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या. तसेच वास्को सप्ताह प्लास्टिक मुक्त साजरा करण्याचीही करण्याचाही आदेश यावेळी देण्यात आला. कायदा सुव्यवस्थेत आडकाठी आणणाऱ्या वर कडक कारवाई करण्याचा आदेशही यावेळी देण्यात आला. तसेच कोविड प्रणालीचे पालन करून श्री दामोदर भजनी सप्ताह साजरा करण्याचे आवाहन यावेळी उपजिल्हाधिकारी स्नेहल प्रभू यांनी दिले.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.