सत्तरी तालुक्यातील तोणीर धबधब्यात वास्कोचे दोघे बुडाले

एकाचा मृतदेह सापडला, दुसऱ्याचा शोध सुरु
Waterfall
WaterfallDainik Gomantak
Published on
Updated on

सध्या गोवा राज्यात सर्वत्र पुरेसा पाऊस झाला असल्याने सर्वत्र धबधबे वेगाने कोसळत आहेत. या पार्श्वभूमीवर नागरिक सहलीच्या निमित्ताने धबधब्यावर जाण्यासाठीचे नियोजण करत आहे. असे नियोजन सत्तरी तालुक्यातील आठ युवक तोणीर धबधब्यावर गेले होते.

आठ जणांपैकी दोघे बुडाले असल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे भागामध्ये खळबळ निर्माण झाली आहे. तसेच बुडालेले दोन्ही तरुण वास्को येथील असल्याची माहिती समोर आली आहे.

(Two of Vasco drowned in Tonir waterfalls in Sattari taluka )

Waterfall
काँग्रेस कारवाईनंतर दिगंबर कामत यांनी सोडले मौन म्हणाले...

याबाबतची सविस्तर वृत्त असे की, सत्तरी तालुक्यातील डोंगराच्या माथ्यावरून कोसळणारे धबधबे प्रत्येकासाठी आकर्षित ठरत असतात. शनिवारी व रविवारी मोठ्या प्रमाणात पर्यटक सत्तरी तालुक्यातील धबधब्यावर सहलीसाठी येत असतात. आज दुपारी तीन वाजता सुमारास वास्को येथील आठ जण सदर ठिकाणी धबधब्यावर आले होते. आंघोळ करीत असताना आठ जणांपैकी दोन जण अचानक बुडाला. यामुळे एकच खळबळ निर्माण झाली.

Waterfall
president election 2022: गोव्यात 100 टक्के मतदान

याची माहिती वाळपईच्या पोलीस स्थानक अग्निशामक दलाला दिल्यानंतर त्यांनी ताबडतोब घटनास्थळी धाव घेऊन या संदर्भात शोधाशोध जारी केलेली आहे. दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार एकाचा मृतदेह पाण्यात तरंगताना आढळल्यानंतर सोबत असलेल्या त्यांच्या मित्रांनी सदर मृतदेह पाण्यातून बाहेर काढला. मात्र दुसऱ्याचा मृतदेह अजून पर्यंत मिळालेले नाही.या संदर्भाची शोधाशोध अग्निशामक दलाच्या यंत्रणेकडून करण्यात येत असून पावसाच्या पाण्याचा प्रवाह प्रचंड प्रमाणात असल्यामुळे मृतदेह सापडू शकलेला नाही.

मिळालेल्या अधिक माहितीनुसार काजरेद्याट तोणीर पाण्याचे पात्र खोल आहे. सध्या या ठिकाणी आंघोळ करणे हे धोक्याचे असून अनेकवेळा या संदर्भाची माहिती पर्यटकांना देऊन सुद्धा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पर्यटकाकडून हूल्लडबाजी केली जात असल्याचे स्थानिकांनी स्पष्ट केलेले आहे.

यामुळे अशा प्रकारची घटना घडल्यामुळे सदर गावाची बदनामी झाली असून अशा धबधब्यावर येणाऱ्या पर्यटकांना बंदी घालावी अशा प्रकारची मागणी स्थानिकांनी केलेली आहे. दरम्यान मृत पावलेल्या दोन्ही तरुणांची ओळख अजून पर्यंत पटलेली नाही. या संदर्भात स्थानिक पोलीस यंत्रणा चौकशीची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत करीत होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com