OBC Federation Of Goa Dainik Gomantak
गोवा

OBC Federation Of Goa: राष्ट्रीय ओबीसी महासंघाची मुरगाव तालुक्यात बैठक

Murgaon News: महासंघाच्या कार्याची व्याप्ती गावागावांत पोचली पाहिजे, या हेतूने महासंघाच्या बैठका सुरू आहेत

गोमन्तक डिजिटल टीम

राष्ट्रीय ओबीसी महासंघाची राज्यात कार्यजागृती व्हावी, यासाठी बैठकांचे आयोजन केले जात आहे. त्यादृष्टीने महासंघाचे मुरगाव तालुक्याचे खारवी समाज अध्यक्ष पद्मनाभ आमोणकर यांच्या निवासस्थानी भेट देत ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय नेते बिंदेश्वरी मंडल यांनी भेट दिली.

मुरगाव तालुक्यात खारवी समाजाचे बहुसंख्य लोक असून महासंघाच्या कार्याची व्याप्ती गावागावांत पोचली पाहिजे, या हेतूने महासंघाच्या बैठका सुरू आहेत.

गेल्या महिन्यात पेडणे तालुक्यातील महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी अन्य समाजबांधवांची भेट घेतली व महासंघाच्या कार्यातून समस्त ज्ञाती बांधवांना भेडसावणाऱ्या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी विश्वासात घेऊन कार्यरत राहण्याचे ठरविले आहे.

त्यादृष्टीने मुरगाव तालुक्यात पद्मनाभ आमोणकर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यविस्तार करण्याचे ठरले आहे.

यावेळी त्यांच्यासमवेत राष्ट्रीय ओबीसी (OBC) महासंघाचे राज्य अध्यक्ष मधू नाईक, सतरकर समाज अध्यक्ष प्रशांत माईनकर, कुंभार समाज अध्यक्ष प्रेमानंद शेटकर, डॉ. शांताराम सुर्मे, केशव सेवा हायस्कूलचे अध्यक्ष पांडुरंग कोरगावकर, वास्कोचे जगदीश दुर्भाटकर, दामोदर नडार, शिवन कोरगावकर आदी उपस्थित होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IPL 2026 Vaping Controversy: ''चहलला जेलमध्ये टाका''! ई-सिगरेट प्रकरणावरुन माजी क्रिकेटपटू कडाडले; बीसीसीआयच्या मवाळ भूमिकेवर उपस्थित केला सवाल

अन्ननलिका जळाली, पाण्यासाठी तरसली, 8 महिने मृत्यूशी दिली झुंज! कोल्ड ड्रिंक समजून तरुणीनं प्यायलं ॲसिड; अखेर डॉक्टरांनी 'असं' वाचवलं

Ravi Yog 2026: अविवाहितांसाठी सनई-चौघड्याचे योग, स्वप्नातील गाडी आणि घराचे स्वप्न होणार पूर्ण; 'रवि योग' ठरणार वरदान

Goa Tiger Death: निसर्गाचा रक्षणकर्ताच धोक्यात! मानवाच्या क्रूरतेमुळे वाघांचा जीव टांगणीला; पूर्वजांनी पुजलेला 'व्याघ्रदेव' रक्ताळला

Fake ED Officer Scam: तोतया ईडी प्रकरणातील मास्टरमाईंड बलरामची पोलिसांना हुलकावणी, हायकोर्टानं फेटाळला जामीन

SCROLL FOR NEXT