Meat Dainik Gomantak
गोवा

Goa: चिकण, मटन विक्रीत होऊ शकते मोठी वाढ

खरेदी वाढणार याची कल्पना असल्याने दुकानदारांनीही अधिक कोंबड्या आणि बकरी आयात केली आहे.

दैनिक गोमन्तक

पणजी: सोमवारपासून श्रावणाला (Shrawan) सुरवात होणार आहे. त्यामुळे पुढील महिनाभर मांसाहाराला फाटा असेल, या पार्श्‍वभूमीवर पणजी (Panjim) शहरासह राज्यातील नागरिकांनी चिकन, मटण आणि नुस्त्यावर ताव मारला. परिणामी, चिकन, मटण आणि मासळी बाजारात माेठ्या उलाढालीची शक्यता आहे. शनिवारपासूनच मार्केटमध्ये मोठी गर्दी उसळल्याचे पहावयास मिळाले. (Meat sales may increase in Goa)

शनिवारी पणजी मार्केटमध्ये खवय्यांची चिकन, मटण आणि माशांच्या खरेदीसाठी गर्दी झाली होती. खरेदी वाढणार याची कल्पना असल्याने दुकानदारांनीही अधिक कोंबड्या आणि बकरी आयात केली आहेत. नेहमीच्या तुलनेत 30 टक्क्यांनी व्यापारात वृध्दी होईल, असे चिकन विक्रेता शब्बीर शेख यांनी सांगितले.

मार्केटमध्ये चिकनचे दर नेहमीप्रमाणेच स्‍थिर आहेत. जिवंत कोंबडा प्रती किलो 150 रुपये, कापलेली कोंबडी प्रती किलो 220 ते 250 तसेच सोललेले चिकन 320 रुपये प्रती किलो विकले जात होते. तर बकऱ्याच्या मटणाचे दर मात्र वाढविण्यात आले आहेत.

कालपर्यंत मटण 800 रुपये प्रतिकिलो विकले जात होते, ते शनिवारी प्रती किलो 900 रुपये इतके होते. कर्नाटकातून बकऱ्यांची आयात करण्यात व्यत्यय येत असल्याने दर वाढल्याचे अमिदअहमद बेपारी यांनी सांगितले. खवय्यांनी दुकांनासमोर गर्दी केल्याने दुपारपर्यंत अनेक दुकानातील चिकन आटोपले होते. संध्याकाळी पुन्हा कोंबड्या मागविण्यासाठी व्यापाऱ्यांची धडपड सुरू होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT