मडगाव: मडगावचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष दामोदर शिरोडकर यांनी आज दिगंबर कामत आणि अन्य नगरसेवकांबरोबर मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची भेट घेत सोनसोडो कचरा समस्या तसेच बऱ्याच दिवसांपासुन प्रलंबित असलेले अनेक प्रश्नांवर चर्चा केली असुन या सर्व प्रश्नांना मार्गी लावण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी सकारात्मकता दर्शवत आहे. तसेच ही कामे लवकरच मार्गी लावणार असल्याचे आश्वासन ही त्यांनी दिले असल्याचे शिरोडकर यांनी सांगितले.
(Mayor of Margao Damodar Shirodkar met Chief Minister Pramod Sawant today )
आज नगराध्यक्ष दामोदर शिरोडकर, आमदार दिगंबर कामत यांच्यासह इतर नगरसेवकांनी नगरविकास मंत्री विश्वजीत राणे यांचीही भेट घेतली. निधीच्या कारणावरून मडगाव पालिकेचे एकही काम अडणार नाही असे आश्वासन नगरविकास मंत्र्यांनी आम्हाला दिले आहे असे कामत यांनी सांगितले.
सोनसोडो कचरा समस्या दूर करण्यासाठी सरकारकडून आवश्यक असलेले सर्व सहकार्य देण्याचे आश्वासन मुखयमंत्र्यांनी दिल्याचे शिरोडकर यांनी सांगितले. तसेच सोनसड्यावर जो कचरा साठून आहे, त्याचे रेमेडीएशन करण्याचे काम येत्या आठवड्यापासून पुन्हा सुरू होणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितले.
या प्रकल्पावर लवकरच बायोडायजेस्टर बसविण्यात येणार आहेत.
यावेळी शिरोडकर यांनी पालिकेच्या कर विभागातील कर्मचाऱ्यांना निवडणुकीच्या ड्यूटी लावल्याने कर थकबाकी वसुलीचे काम अडले आहे. याकडे मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधले असता या कर्मचाऱ्यांना बीएलओच्या ड्यूटीतून मुक्त करण्याचे आश्वासन दिले असे त्यांनी सांगितले.
मडगाव पालिकेत नोकरभरतीचे काम अडून पडले आहे. त्यामूळे पालिकेच्या कामावर परिणाम होतो असे शिरोडकर यांनी सांगितल्यावर ही प्रक्रियाही लवकर सुरू करण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिल्याचे शिरोडकर यांनी सांगितले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.